आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय शाेधमाेहीम.. पालक सचिवांच्या नावाची!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विविध कल्याणकारी आणि लोकोपयोगी योजनांचा अाढावा तसेच सरकारी कामकाजात गतिमानता अाणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालक सचिवांनी महिन्यातील किमान चार दिवस त्यांच्याकडे जबाबदारी साेपविण्यात अालेल्या जिल्ह्यातच ठाण मांडण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी नुकतेच दिले आहेत. पण, त्यानुसार येत्या शुक्रवारी जिल्ह्याच्या पालक सचिवांच्या दाैऱ्याची लगबग प्रशासकीय पातळीवर सुरू झाली अाहे. मात्र, जिल्ह्याचे पालक सचिव सध्या नेमके अाहेत तरी काेण?, याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच नाही. त्यामुळे येणाऱ्या पालक सचिवांचे नाव शोधण्यासाठी प्रशासनाची एकच धांदल उडाली आहे.

संथ शासकीय कारभारास वेग आणण्यासाठी हे पालक सचिव प्रत्येक महिन्याच्या पहिल्या अाणि तिसऱ्या शुक्रवारी-शनिवारी असे महिन्यातील चार दिवस जिल्ह्यातच मुक्कामी राहणार अाहेत. विशेष म्हणजे या कालावधीत संबंधित मंत्र्यांनी कुठलीही बैठकदेखील मंत्रालयात बाेलावू नये, या अाढावा दाैऱ्यात काेणताही अडथळा येऊ नये, असे मुख्यमंत्र्यांचेच आदेश आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरही कामे वेळेत करण्याचा दबाब वाढला आहे. पण, टी. सी. बेंजामिन आणि त्यानंतर नाशिकहून मुंबईला महापालिकेचे अायुक्त म्हणून बदलून गेलेले अजेय मेहता यांच्या बदलीनंतर जिल्ह्याचे पालक सचिव सध्या कोण आहेत? याबाबत प्रशासनच अनभिज्ञ आहे. त्यामुळे उद्या पालक सचिव म्हणून नेमके काेण येणार? ते येणार की नाहीत? हाही कुतूहलाचाच विषय आहे. विशेष म्हणजे दि. जानेवारी २०१६ रोजी मुख्य सचिव स्वाधीनक्षत्रिय यांनी हे आदेश काढले आहेत. त्यात अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव अशा सर्वांवरच पालक सचिव ही जबाबदारी असून, त्या-त्या जिल्ह्यातील सर्वच शासकीय योजनांची कार्यस्थळी जाऊन पाहणी करण्यासह त्यांचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात अाले. शिवाय त्यात कुठलीही कसूर राहता कामा नये, यासाठी हा उपक्रम संबंधित पालक सचिवांच्या केआरएचा एक भाग बनविण्यात अाला असून, त्याद्वारे त्यांचे वार्षिक मूल्यांकनही ठरविले जाणार आहे. त्यामुळे कामे काटेकोर आणि नियमितपणे करण्याची जबाबदारी आता या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील कामकाजात गतिमानता येण्यास होणार असला, तरीही प्रशासन पालक सचिवांबद्दल अनभिज्ञ असणे, ही बाब या उपक्रमाकडे जिल्हा प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याचे उत्तम उदाहरण आहे.

कामकाजाबाबत ही अाहे अधिकाऱ्यांवर जबाबदारी
प्रत्यक्षकार्यस्थळी पाहणी, क्षेत्रीय भेटी, शासनाच्या सर्वच विभागांच्या योजना, कामकाजाची, त्यात काय सुधारणा करणे आवश्यक आहे याची माहिती घेणे. योजनांची आर्थिक, भौगोलिक स्थिती जाणून घेणे, त्रुटी दूर करून योजना सुरळीत करण्यासाठीचे उपाय सुचवत त्याची अंमलबजावणी करणे, अहवाल मुख्य सचिवांना सादर करणे.

मंत्रालय स्तरावर चार
दिवस नसतील बैठका...

अपरमुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यावर जिल्हा दौऱ्याचे काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे काेणी मंत्री, राज्यमंत्र्यांनी काेठेही या कालावधीत बैठका घेऊ नयेत, असे मुख्यमंत्र्यांचेच आदेश अाहेत. त्यांनी संबंधित मंत्र्यांना तशा सूचना दिल्याचेही मुख्य सचिवांनी दि. जानेवारी २०१६ च्या शासन निर्देशात नमूद केले आहे.

नाशिकचे पालक सचिवपद सध्या मात्र रिक्तच
टी.सी. बेंजामिन अाणि अजेय मेहता यांच्यानंतर नाशिकला अजून पालक सचिवच मिळालेला नसल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ने या पदावर काेण? याचा शाेध घेतला असताना उघडकीस अाली. प्रशासकीय पातळीवर अनेक अधिकाऱ्यांना मात्र रात्री उशिरापर्यंत नाशिकचे पालक सचिव काेण, याचे उत्तर सांगता अाले नव्हते.
बातम्या आणखी आहेत...