आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guidance Of Engineering, Science, Agricultural Sector Students

"डिपेक्स'ने घडविले 175 उद्योजक, 7 ते 11 मार्चदरम्यान इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अभियांत्रिकी,विज्ञान कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक आविष्काराला व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच डिपेक्स प्रदर्शनातून यंदा उद्योजक होण्यासाठी नामवंत उद्योजकांचे मिळणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. स्कील डेव्हलपमेंट, उद्योगक्षेत्राची गरज, नावीन्यपूर्णता आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी अशा विविध विषयांवर त्या-त्या क्षेत्रातील प्रख्यात उद्योजकांचे चर्चासत्र होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा करून देतानाच राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही "डिपेक्स'ला भेट देणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अायाेजित करण्यात अालेला राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा आणि भव्य प्रदर्शन असलेला "डिपेक्स' यंदा नाशिकमध्ये भरणार आहे. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर संदीप फाउंंडेशन यांच्या िवशेष सहकार्याने येत्या 7 ते 11 मार्चदरम्यान अंबड येथील इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये हा उपक्रम होत आहे.
"अभाविप'तर्फे १९८४ मध्ये सांगलीमध्ये प्रथम डिपेक्सचे आयोजन केले होते. त्यानंतर गेल्या २७ वर्षांपासून डिपेक्स स्पर्धा प्रदर्शन हाेत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, आजवर १७५ यशस्वी उद्योजक घडले आहेत, तर १७५ अभियंते नामवंत कंपन्यांमध्ये संशोधन विकास विभागात कार्यरत आहेत.
अशी आहे डिपेक्सची संयोजन समिती...
संयोजनसमितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र गोलिया, उपाध्यक्ष आशिष कटारिया, सचिव सुधीर मुतालिक, तर सदस्यपदी रंजना पाटील, पी. डी. भिडे, सुरेश पाटील, आलोक झा, संदीप झा, समीर वाघ, थोन्टेश, सलिल राजे, राधेश्याम केडिया, मकरंद महादेवकर, आशिष कुलकर्णी, राम भोगले, प्रशांत टोपे, निशिकांत अहिरे, नेहा खरे, अपूर्वा जाखडी अाहेत.