आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gulf Supercross Competition News In Nashik, Divya Marathi

\'\'धूम..धूम..मचाले धूम!\'\' गल्फ सुपरक्रॉस’मध्ये चित्तथरारक कसरती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गल्फ सुपरक्रॉसमध्ये राष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांच्या चित्तथरारक कसरतींनी व नाशिकच्या यश मोहन पवार या 14 वर्षांच्या बालकाने ‘डेमो क्रॉस’मध्ये विजेतेपद पटकावत उपस्थितांची मने जिंकली.
प्रदर्शनी सामन्यात काही लॅप्समध्ये यशला पुण्याचा युवराज कोंडे (वय 11) हा पिछाडीवर टाकतो की काय, असे क्षणदेखील आले. तर पुण्याचाच ऋग्वेद बारगजे हा तिसर्‍या लॅपमध्येच कोसळल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यशने त्याची आघाडी राखत डेमो क्रॉसच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. नाशिकरोडच्या सेंट झेविअर्समध्ये नववीत शिकणार्‍या यशने देश-विदेशांत 65 रेसमध्ये भाग घेतला आहे.

260 सीसीच्या देशी दुचाकी स्पर्धा
250 सीसी परदेशी दुचाकी स्पर्धा


स्पर्धेत एकमेव महिला
मुंबईची निधी शुक्ला या एकमेव मुलीने पुरुषांच्या 260 सीसी इंडियन गटात आक्रमकपणे स्पर्धेला प्रारंभ केला. मात्र, पहिल्याच लॅपच्या अखेरच्या टप्प्यात तिची गाडी स्लीप झाली आणि तिच्या हाताला दुखापत होऊन ती स्पर्धेबाहेर गेली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : 500 सीसीपर्यंत फॉरेन क्लास - के. पी. अरविंद, हॅरीथ नोआह, आर. नटराज, 500 सीसीपर्यंत फॉरेन दुचाकी - हॅरीथ नोआह, के. पी. अरविंद, प्रमोद जोशुआ, 250 सीसीपर्यंत खासगी फॉरेन दुचाकी - जिग्नेश पटेल, अभिजितसिंह जाधव, गणेश लोखंडे (नाशिक), 260 सीसीपर्यंत खासगी एक्स्पर्ट क्लास - आकाश सातपुते (औरंगाबाद), जगजित सिंग, श्यामलाल परदेशी, 260 सीसीपर्यंत भारतीय नोव्हिस क्लास - क्षितिज शुक्ला, सय्यद आसिफ अली (भोपाळ ), मोहम्मद फैसल, 260 सीसीपर्यंत भारतीय एक्स्पर्ट क्लास - के. पी. अरविंद, प्रमोद जोशुआ, आर. नटराज, 260 सीसीपर्यंत खासगी एक्स्पर्ट क्लास - आकाश सातपुते (औरंगाबाद), नरेंद्रसिंह पवार, गणेश लोखंडे (नाशिक), 260 सीसीपर्यंत लोकल क्लास फॉरेन - गणेश लोखंडे, आदित्य ठक्कर, आशिष नायर (सर्व नाशिक ), 260 सीसपर्यंत इंडियन एक्स्पर्ट क्लास - के. पी. अरविंद, प्रमोद जोशुआ, आर. नटराज, 260 सीसीपर्यंत प्रायव्हेट फॉरेन क्लास - जिग्नेश पटेल, अभिजितसिंह जाधव, गणेश लोखंडे (नाशिक), 260 सीसीपर्यंत एक्स्पर्ट फॉरेन क्लास - के. पी. अरविंद, हॅरीथ नोआह, आर. नटराज.