आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरातून होणार मोहोर ‘गुल’, निरुपयोगी असल्याने रोपे वाटण्यास मज्जाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उन्हाळ्यात नयनमनोहर वाटणारे; परंतु एरवी निरुपयोगी ठरणारे गुलमोहोर वृक्ष नाशिकमधून हद्दपार करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचा पहिला भाग म्हणून महापालिकेच्या नर्सरीतून गुलमोहोराची रोपे काढून टाकण्याचा आदेश स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी दिला आहे. यापुढे गुलमोहोर कोठेही लावू नये, असे आदेशही त्यांनी प्रशासनास दिले.

वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, बेल, चिंच, बाभूळ यांसारख्या स्थानिक प्रजातींची झाडे लावणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात पेल्टाफोरम, गुलमोहोर, ऑस्ट्रेलियन अकेशिया, सुरू अशी झाडे लावली जातात. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होत नाहीच; शिवाय त्याचे लाकूड ठिसूळ असल्यामुळे धोका असतो, ही बाब धोंगडे यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी गुलमोहोराची रोपे महापालिकेच्या नर्सरीबाहेर काढण्याचे आदेश दिले. पाने मोठी असलेल्या झाडांची प्राणवायू सोडण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळेच काही कालावधी वगळता वर्षभर पाने हिरवी राहणारे कडुनिंब, वड, पिंपळ असे वृक्ष सर्वोत्तम समजले जातात. तसेच, दुधाळ म्हणजे पान वा फूल तोडल्यानंतर दुधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडणारे उंबरासारखे वृक्षही प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.

गुलमोहोर का नको?

0 ऑक्सिजन बाहेर सोडण्याचे प्रमाण कमी

0पक्ष्यांना फुलांचा उपयोग नाही

0पक्षी या झाडांवर बसतदेखील नाहीत

0अतिशय ठिसूळ असलेले झाड

0पावसाळ्यात पडण्याची शक्यता असल्याने धोका