आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीने बंदुकीतून गाेळी उडाली, दहा जण जखमी; सप्तशृंगी गडावर सुरक्षारक्षकाचा निष्काळजीपणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळवण - सप्तशंृगगडावर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू असलेल्या नवरात्र उत्सव सांगता साेहळ्यात सुरक्षारक्षकाच्या हातून चुकून गाेळीबार झाल्याने १० जण जखमी झाले. मंगळवारी ही घटना घडली. कळवण पोलिसांनी सदर सुरक्षा रक्षकाविराेधात गुन्हा दाखल करुन त्यास ताब्यात घेण्यात अाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.
देवीच्या साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर मंगळवारी नवरात्राेत्सवाचा सांगता कार्यक्रम सुरू हाेता. सालाबादप्रमाणे सकाळी दरेगावचे देवीभक्त यांच्या हस्ते ट्रस्टच्या विश्वस्त सरपंच, ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवीच्या सुवर्ण अलंकारांची पूजा करून ध्वज मिरवणूक काढण्यात अाली. त्यानंतर सकाळी १० वाजता, दीपमाळेजवळ देवीच्या दैत्यासाठी बोकडबळीचा कार्यक्रम पार पडला. सांगता कार्यक्रमात बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली जाते. सुरक्षारक्षक वामन श्रावण चव्हाण (५०) याच्याकडे ही जबाबदारी हाेती. मात्र निष्काळजीपणामुळे त्याच्या हातून बंदुकीचे ट्रीगर दाबले गेले. त्यामुळे जमिनीकडील बाजूस फरशीवर झालेल्या एक राउंड फायरने शेजारी उभ्या असलेले चार सुरक्षा कर्मचारी सहा नागरिकांच्या पायांत गाेळीतील छर्रे फरशीचे तुकडे घुसल्यामुळे ते जखमी झाले. यापैकी अाठ जखमींना तत्काळ उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी सागर देविदास दुबे (२०), मधुकर बाबूराव गवळी (४५) यांना वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व जखमींची प्रकृती ठीक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग पगार यांनी दिली.

जखमींना मदत
सप्तशंृगट्रस्टच्या वतीने नवरात्रीत सर्व कर्मचारी भाविकांचा विमा काढण्यात अाला हाेता. त्या अंतर्गत जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मदत दिली जाईल. तर जखमी भाविकांनाही जनसुरक्षा विमा अंतर्गत मदत दिली जाणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात अाले. सप्तशंृग गडावर दसऱ्याला दैत्यासाठी शतचंडी याग करून बोकडबळी दिला जातो. या बोकडबळीनंतर त्याच्या रक्ताने नोटा माखवून त्या जवळ ठेवून वर्षभराची बरकत वाढविण्याची प्रथा असल्यामुळे असंख्य भाविक दसऱ्याला गडावर गर्दी करतात.
बातम्या आणखी आहेत...