आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापा-यांना बंदुकीचा धाक दाखवणारी टोळी जेरबंद, सापळा पिस्तूल काडतूस जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हातगाडी व्यावसायिकांना पिस्तूलचा धाक दाखवून खंडणी वसूल करणा-या चार सराईत गुन्हेगारांना पंचवटी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सोमवारी (दि. ६) पहाटे पंचवटी परिसरात ही कारवाई केली.

पंचवटी परिसरातील हातगाडी व्यावसायिकांना रविवारी बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रकार घडला होता. पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रामवाडी, क्रांतीनगर आणि हनुमानवाडी भागात सापळा रचून कुंदन परदेशी, गणेश कालेकर, मयूर कानडे, राकेश शेवाळे या चार सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्याकडून (एमएच १५ डी ९७९९) कार हस्तगत केली. त्यात पिस्तूल लपवून ठेवले असल्याचे संशयितांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बी. बी. पालकर, एएसआय संजय पवार, राजेश लोखंडे, विजय वरंदळ, युवराज गायकवाड, विजय गवांदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खून, प्राणघातक हल्ला, खंडणी, आदी डझनभर गंभीर गुन्हे त्यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. पंचवटी परिसरात यापूर्वी दाेन ठिकाणी पिस्तुल बाळगणा-या संशियतांना अटक करण्यात आली हाेती. तर हनुमानवाडी येथे सराईत गुन्हेगारांनी हवेत गाेळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला हाेता. अटक केलेल्या संशयितांकडून अवैधरित्या हत्यार बाळगणा-या काही सराईत गुन्हेगारांची नावे उघड हाेण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली. पंचवटीमध्ये छाेट्यमाेठ्या व्यावसाियकांना लुटण्याचे प्रकार नियमित घडत हाेते. टाेळी जेरबंद झाल्याने लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे यांनी व्यक्त केली आहे.