आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज प्रभातसमयीच गुरुपुष्य लाभ; सूवर्ण पेढ्या उघडल्या सकाळी सहा वाजताच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सोने खरेदीसाठी सर्वात्तम मानल्या जाणार्‍या गुरुपुष्यामृतदिनी (दि. 13) सकाळी 6 वाजेपासून 7.55 वाजेपर्यंत लाभ-अमृत मुहूर्त असल्याने शहरातील बहुतांश सराफी पेढय़ा सकाळी सहा वाजताच उघडल्या असून, एवढय़ा लवकर पेढय़ा उघडण्याची ही दोन वर्षांतील दुसरी घटना असेल.

हिंदू पंचांगानुसार सोने व रत्न खरेदीसाठी पुष्य नक्षत्रावर येणारा गुरुवार अत्यंत लाभदायी मानला जातो. याच दिवसाला गुरुपुष्यामृत संबोधले जाते. सन 2013 मधील हे शेवटचे गुरुपुष्यामृत असल्यानेदेखील त्याला विशेष महत्त्व आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या दिवशी सोनेखरेदी केली जातेच; मात्र या दिवशी लाभ-अमृत योगावर केलेली सोने खरेदी धनसंचयासाठी सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे गुरुवारी नाशिककर ही पर्वणी साधणार आहेत.

उत्तरायणामुळे महत्त्व
वर्षातील शेवटचे गुरुपुष्य उत्तरायणात येते आहे. हा अतिशय शुभ कालखंड असतो. त्यामुळेच या मुहूर्तावर सोने खरेदी म्हणजे अक्षय्य धनसंचय असल्याची ग्राहकांची श्रद्धा आहे.
-डॉ. प्रसादशास्त्री कुलकर्णी, विद्यावाचस्पती

असे आहेत मुहूर्त
सकाळी : 6 ते 7.55 (लाभ-अमृत)
दुपारी : 12.30 ते 3.30 (लाभ-अमृत)
सायंकाळी : 6.30 ते 8.00 (अमृत)

खरेदीची तयारी
सकाळी सहा वाजताच पेढी उघडणार आहोत. सोन्याचे शिक्के, नाणी, बिस्किट, वेढणे यांच्या मुहूर्तावरील खरेदीसाठी तयारी केली असून, दागिने नियमित वेळेत मिळतील.
-वृजयेंद्र वाघचौरे, पु. ना. गाडगीळ पेढी