आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने केली गुटखा पुड्यांची होळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव: जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधत येथील राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मसगा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गुटखा व तंबाखूच्या पुड्यांची होळी करून युवकांना व्यवसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
धूम्रपान व तंबाखूमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तोंडाचा व घशाचा कॅन्सर तसेच स्मरणशक्ती कमी होणे, पोट व हृदयाचे विकार जडतात. महाविद्यालयीन युवकांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन व्हावे, या उद्देशातून राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुटखा, तंबाखूच्या पुड्यांची होळी केली. या अभिनव कार्यक्रमात युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याची शपथही देण्यात आली. गुटखाबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा युवकांनी दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी सेवा दलाचे विजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष भरत आखाडे, कुणाल बडजाते, सुनील मोहन, नीलेश रोकडे, मयूर नांद्रे, सतीश जाधव, सचिन जाधव आदी उपस्थित होते.