आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा, पानमसाल्यावर संशोधकांच्या अहवालावरूनच बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मानवी आरोग्याचे महत्त्व विचारात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी कोणत्याही अन्न वस्तूची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्रीस प्रतिबंधाबाबत संसदेने अन्न सुरक्षा प्रशासनास जबाबदार धरले. तसेच विविध वैज्ञानिक संशोधनातून डझनभर आजार होत असल्याचे आढळून आल्याने राज्य शासनाने गेल्या आठवड्यापासून गुटखा, पानमसाल्यावर वर्षभरासाठी बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यभरातील पान दुकानदारांकडून संघटित विरोध होत आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असले तरी तंबाखू, गुटखा विक्रेत्यांचा निर्णयास विरोध आहे.

वैज्ञानिक संशोधन : गुटखा, पान मसाल्याच्या करण्यात आलेल्या वैज्ञानिक संशोधनात अपायकारक गोष्टी उघड झाल्याचे शासनाच्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. टाटा स्मृती रुग्णालयातील संशोधनात ओरल सबम्युकस फायब्रोसिस होण्यास सर्वात महत्त्वाचा सुपारी हा घटक असल्याचे पुढे आले आहे. सुपारी सेवन आणि तोंडाचा कर्करोग तसेच कर्करोगपूर्व लक्षणे या दोन्हींचा संबंध टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संशोधनात स्पष्ट झाले आहेत. डॉ. जेम्स ई हॅमनर यांच्या अभ्यासात कर्करोगपूर्व लक्षणांमधून पुढे कार्सिनोमा होतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय दंत महाविद्यालयाच्या अहवालात गुटखा व पानमसाला सेवनाने ओरल सबम्युकस फायब्रोसिस होतो. 2013 मधील नोंदीत 180-200 रुग्ण हे ओरल सबम्युकस फायब्रोसिसचे शिकार झाले होते. तसेच गुटखा चघळल्यामुळे ओरल सबम्युकस फायब्रोसिस होतो आणि अशा रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, ग्लोबल अँडल्ट टोबॅको सव्र्हे ऑफ इंडिया, सलाम बॉम्बे फाउंडेशन, रिप्रॉडक्टिव्ह टॉक्सीकॉलॉजी, सय्यद अख्तर, सामुदायिक चिकित्सा व व्यवहार विज्ञान विभाग, कुवेत विद्यापीठ, आयएआरसी मोनोग्राफ, राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था आदी 29 संस्थांच्या संशोधनात गुटखा व पानमसाला सेवनाने विविध आजार होत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाने गुटखा व पानमसाल्यावर बंदी घालण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.

डझनभर आजार
गुटखा व पानमसाल्यातील तंबाखू, सुपारी आणि त्यातील मिर्शणे घातक असून, त्यामुळे अँक्युट हायपर मॅग्नेशिया, हृदयविकार, ओरल सब म्युकस फायब्रेसिस, तोंडाचा कर्करोग, ल्युक्योप्ल्याकिया, अन्ननलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, मेटाबॅलिक अबनॉरमॅलिटी, प्रजनन स्वास्थ्य व आरोग्य, जठर, आतडे व श्वसन संस्थेशी संबंधित आजार होत असल्याचे वैज्ञानिक संशोधनात स्पष्ट केले आहे.

वर्षभरासाठी प्रतिबंध
स्वादिष्ट व सुगंधित गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट व सुगंधित तंबाखू, खर्रा या स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधली जाणारी किंवा ग्राहकांना मिर्शण करण्यास सहजरीत्या सुलभ होईल, अशा रीतीने विकलेली, वितरित केलेली तंबाखू, सुपारी यांची निर्मिती, साठवण, वितरण, विक्रीस वर्षभरासाठी प्रतिबंध करण्यात आला असून, या निर्णयाची अंमलबजावणी सुरूआहे. शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई