नाशिकसह उत्तर महाराष्‍ट्राला / नाशिकसह उत्तर महाराष्‍ट्राला गारपिटीचा पुन्हा तडाखा, कोकणाला झोडपले, पुण्यात सरी

Dec 12,2014 07:32:00 PM IST
नाशिक/रत्नागिरी- नाशिकसह धुळे जिल्ह्याला दुसर्‍या दिवशीही गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे उरली सुरली पिके गमवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. डाळिंब आणि द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, कोकणात अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. नाशिकमधील चांदवड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुणे आणि औरंगाबादलाही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, मालेगाव, चांदवड, बागलाण, देवळा व येवला या सात तालुक्यातील अनेक गावांना गुरुवारी सायंकाळी बेमोसमी पावसासह गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. यामुळे रब्बी पिकांबरोबरच कांदा आणि द्राक्षबागांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. आज (शुक्रवारी) दुसर्‍या दिवशीही गारपिटचा तडाखा बसला आहे.
दुष्काळाने पोळणार्‍या विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याअभावी पिके वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारपिटीमुळे तर कोकणात मुसळधार पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेल्या पीक गमवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात फळबागांचे झालेले नुकसान...
X