नाशिक - नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांवर अस्मानी संकटाने पुन्हा घाला घातला. निफाड, सिन्नर, मालेगाव, चांदवड, बागलाण, देवळा व येवला या सात तालुक्यांमधील अनेक गावांना गुरुवारी सायंकाळी बेमोसमी पावसासह गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे रब्बी पिकांबरोबरच द्राक्षबागांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी पिकांबरोबरच द्राक्षबागांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
- लासलगाव,निफाड | तालुक्यातीलरुई, देवगाव, मानोरी, सारोळे थडी,धानोरे, वाकद, खेडलेझुंगे, महादेवनगर, धारणगाव या भागात वादळी वा-यासह गारपिटीने दैना उडविली. त्यामुळे शेतांमध्ये सुमारे तीन इंचांपर्यंत गारांचे थर साचले होते.
- चांदवड| शहरपरिसरात गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास आलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या
खरीप कांदा पिकाचे शेतात काढून पडलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
- सटाणा| लखमापूरपरिसरात सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान सुमारे एक तास वादळी वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. यामुळे डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान झाले.
- देवळा| तालुक्यातीलखर्डे, पिंपळगाव वाखारी, लोहोणेर परिसरात गुरुवारी सायंकाळी ७.१५ ते ७.४५ दरम्यान झालेल्या वादळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा मका भिजला.
- येवलातालुक्यातसायंकाळी १५ मिनिटे पाऊस झाला. मुखेड, देशमाने या पश्चिम भागात गारपीट झाल्याने रब्बीच्या पिकांची वाताहत झाली. परिसरात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बरेचशे शेतकारी सावध होते. तरीही शेतात उघड्यावर असलेल्या कांद्याचे अतोनात नुकसान झाले.
- सिन्नर तालुक्यातील गोंदे, मुसळगाव, कुंदेवाडी, दातली, धोंडवीरनगर, मनेगाव परिसराला सायंकाळी वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने झोडपले, तर गोंदे, पाटोळे परिसरात पाच ते दहा मिनिटे गारपीट झाली. येथेही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वातावरणात उकाडा असल्याने पावसाची शक्यता वर्तविली जात होती. दुपारनंतर तो सुरू झाल्याने शेतकऱ्यांची त्रेधा उडाली.
मालेगाव| तालुक्यातसायंकाळी सातच्या सुमारास वादळी पावसासह गारपीट झाली. शहरात तब्बल तासभर पाऊस सुरू होता. वडनेर, खाकुर्डी, आघार, लखमापूरला दहा मिनिटे झालेल्या तुफान गारपिटीमुळे अर्धा फुटांपर्यंत गारांचा थर तयार झाला होता. शेतकरी हवालदिल झाला आहे. दाभाडी, रावळगाव, टेहरे, मुंगसे, सौंदाणे येथेही पाऊस झाला.