आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलमार्क साेन्याची विक्री एेच्छिक असावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - हाॅलमार्क असलेल्या साेन्याची विक्री देशात बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, ‘बीअायएस अॅक्ट १९८६’मधील दुरुस्तीसंबंधी विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मांडण्याचा सरकार विचार करीत अाहे. या निर्णयावर सराफ व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हाॅलमार्क साेन्याची विक्रीचा निर्णय एेच्छिक असावा, अशी भावना सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली.

‘दैनिक भास्कर’ने हाॅलमार्क नसलेल्या साेन्याच्या विक्रीतून प्रचंड फसवणूक हाेत असल्याचा पर्दाफाश केला हाेता. ‘दै. भास्कर’ने गेल्या अाठवड्यात साेन्याच्या २५ नुमन्यांची वेगवेगळ्या लॅबमध्ये तपासणी केली असता, एक नमुना साेडला तर शंभर टक्के शुद्ध साेने काेणत्याही नमुन्यात अाढळून अाले नाही. साेन्याच्या भेसळीबाबतचा हा अहवाल केंद्रीय ग्राहक हक्कविषयक मंत्री रामविलास पासवान यांना दिल्यानंतर त्यांनी हाॅलमार्क असलेल्या साेन्याचीच विक्री बंधनकारक करणार असल्याचे सांगितले. यावर सराफ व्यावसायिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया अाहेत. हाॅलमार्किंगमुळे साेन्यातील भेसळ, ग्राहकांची लूटमार थांबेल असे नाही. ग्राहकांचा नामांकित जुन्या पेढ्यांवर विश्वास कायम असल्याचे काही व्यावसायिकांचे म्हणणे हाेते. पारंपरिक पेढ्यांमध्ये हाॅलमार्क दागिने विक्रीसाठी अाहे. ते माेडायला वा बदलण्यासाठी बिगर घटीची सवलत असल्याने ग्राहकांना ९७ ते ९८ टक्के पैसे परत मिळतात. तर, हाॅलमार्क दागिने बदलताना, माेडताना ग्राहकाला ८० टक्के पैसे परत मिळतात, असा दावा व्यावसायिकांनी केला. हाॅलमार्कसाठी पहिल्या वर्षी ५० हजार रुपये फी भरावी लागते. हाॅलमार्क तपासणीसाठी दीडशे रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने छाेटे व्यावसायिक अडचणीत येतील, असे मत व्यक्त केले गेले.

व्यवस्थेची गरज
हाॅलमार्कच्यानिर्णयाची अंमलबजावणी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केल्यानंतर व्हावी. जवळच हाॅलमार्कची व्यवस्था असावी. हाॅलमार्कचे दागिने कमी दर्जाचे निघाल्याने याेग्य मशिनरी असावी. मणी, चेन, यावर कुठे हाॅलमार्क हाेणार? -फत्तेचंद राका,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सराफ महामंडळ

स्वागतार्ह निर्णय
हाॅलमार्कसाेने विक्री अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्ह अाहे. हाॅलमार्क अधिकारी व्यावसायिक यांच्यातील लागेबांधे असल्याने हाॅलमार्क दागिन्यांत भेसळ हाेऊ शकते. राजेंद्रकुलथे, ज्येष्ठ व्यावसायिक

सुरक्षिततेचे काय?
निर्णयस्वागतार्ह अाहे, मात्र ग्रामीण भागात हाॅलमार्किंगची व्यवस्था हवी. हाॅलमार्किंगसाठी व्यावसायिकाला दूर जावे लागेल, त्यादरम्यान सुरक्षिततेची जबाबदारी काेणाची असेल? राहुलमहाले, सेक्रेटरी, सराफ असाेसिएशन

ग्राहकांचे नुकसान
हाॅलमार्कदागिन्यांच्या नावाखाली २३ टक्के मजुरी घेतली जाते. हा दागिना माेडण्यास किंवा बदलण्यास गेल्यास मजुरी परत मिळत नाही, अप्रत्यक्षरीत्या ही ग्राहकांची फसवणूक अाहे.-मिलिंद दंडे,अध्यक्ष,नाशिकराेड सराफ असाेसिएशन