आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंडाभर चांदण्या’ची भारंगम महोत्सवासाठी निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाचे दाहक वास्तव जिवंत साकारणाऱ्या ‘हंडाभर चांदण्या’ या सोशल नेटवर्किंग फोरम निर्मित प्रायोगिक नाटकाची निवड आंतरराष्ट्रीय ‘भारंगम’ महोत्सवासाठी झाली आहे. एनएसडी (राष्ट्रीय नाट्य शाळा) च्या फेब्रुवारी २०१७ पासून सुरू होणाऱ्या १९ व्या भारत रंग महोत्सवात जाणारे हे एकमेव मराठी प्रायोगिक नाटक आहे.
नाशिकच्या दत्ता पाटील लिखित, सचिन शिंदे दिग्दर्शित या नाटकाने आता आंतरराष्ट्रीय रंगमंचावर जागा तयार केली आहे. भारत आणि विदेशातून आलेल्या सुमारे ६०० प्रस्तावांतून ५० भारतीय, तर १९ विदेशी नाटकांची निवड झाली आहे. भारतीय रंगभूमीवरील ३२ तज्ज्ञ, समीक्षक आणि ज्येष्ठ अभ्यासकांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. महाराष्ट्रातून भारंगमसाठी निवड झालेले हे एकमेव मराठी प्रायोगिक नाटक असल्याची माहिती या नाटकाचे निर्माते आणि सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी दिली.

या नाटकामध्ये दुष्काळी भागातील एका माळरानावर पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारे गावकरी पाहायला मिळतात. अगतिक झालेल्या गावकऱ्यांनी विकोपाला जाऊन उचललेले सरकारी यंत्रणेविरुद्धचे पाऊल या गोष्टी नाटकात प्रभावी ठरतात. भारतातील नाट्य महोत्सवांतील मानाचा असा हा महोत्सव असून, त्यात महाराष्ट्रातून फक्त एकच नाटक निवडले गेले. एनएसडीचा यंदाचा १९ वा ‘भारंगम’ महोत्सव असून, १९९९ मध्ये त्याची सुरुवात झाली. हा आशिया खंडातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव मानला जातो. ते २१ फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्ली येथे हा महोत्सव होईल. फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी वाजता दिल्लीतील श्रीराम सेंटर ऑडिटोरियम येथे ‘हंडाभर चांदण्या’चा प्रयोग होईल. नाटकात लोकसंगीताच्या माध्यमातून सद्यस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक टोकदार भाष्य करणाऱ्या या दीर्घांकात प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, गीतांजली घोरपडे, नूपुर सावजी, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे असून, नेपथ्य ईश्वर जगताप राहुल गायकवाड, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा माणिक कानडे, संगीत रोहित सरोदे निर्मिती व्यवस्था सदानंद जोशी, कैलास पाटील यांची आहे.

सोशल नेटवर्किंग फोरमच्या अभियानाला मदतनिधी
सोशलनेट वर्किंग फोरमच्या माध्यमातून गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त भागातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे अभियान हाती घेतले होते. या अभियानांतर्गत महिन्यांत गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यात आले. या उपक्रमाच्या निधी संकलनासाठी हंडाभर चांदण्याच्या प्रयोगांतून मदत झाली. ज्यामध्ये आयएमएच्या नाशिक चॅप्टरने तब्बल साडेतीन लाख रुपयांची मदत केली, अशी माहिती प्रमोद गायकवाड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...