आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद: रिझवानला मिळाला अभियांत्रिकीत प्रवेश; संपूर्ण शिक्षण मोफत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जन्मत: अपंग असलेल्या व दहावीत 70 टक्के गुण प्राप्त केलेल्या रिझवान शेख या विद्यार्थ्याचे संगणक अभियंता होण्याचे स्वप्न आहे. परंतु, अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या प्रवेश शुल्कासाठी पैसे नसल्याने त्याचा प्रवेश रखडला होता. याबाबतचे वृत्त गुरुवारी ‘दिव्य मराठी’ने देताच वडाळारोड येथील जेएमसीटी पॉलिटेक्निक कॉलेजने रिझवानला प्रवेश देण्याचा व संपूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला.

जेएमसीटी कॉलेजचे विश्वस्त हाजी रउफ पटेल यांनी याबाबत सांगितले की, रिझवानला संपूर्ण शिक्षण मोफत देण्याबरोबरच त्याच्या देखभालीसाठी संस्था दोन केअरटेकरची नेमणूक करणार आहे.

आशीर्वाद हवे : रिझवानची आई सलमा म्हणाल्या की, रिझवानला नाशिककरांचे आशीर्वाद हवेत. रिझवानच्या नावाखाली कोणी पैसे मागत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.