आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: हनुमान जयंतीनिमित्त शहरात अाज विविध धार्मिक कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हनुमानजयंती निमित्त मंगळवारी (दि.११) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर यांसह सातपूर परिसरातील हनुमान मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी परिसरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर यांसह शहरातील हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
पंचवटीतील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक होणार आहे. सूर्योदयावेळी जन्म आरती, १०८ हनुमान चालिसा सामुहिक पठण होणार आहे. सायंकाळी पुष्पांजली महिला मंडळाचे संगीतमय संुंदरकांड होणार असल्याची माहिती महंत भक्तीचरणदास महाराज यांनी दिली. पंचमुखी हनुमानजींना १५१ किलो वजनाचा लाडू प्रसाद म्हणून चढविला जाईल. पंचवटीसह इंदिरानगर येथील पंचमुखी हनुमान मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम हाेणार अाहेत. गंगापूर नाका येथील हनुमानमंदिर, केटीएचएम कॉलेजजवळील हनुमान मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर असून तेथेही विविध कार्यक्रम होणार आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...