आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरीच्या हापूस अांब्याचा शहरात पसरला दरवळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे केवळ द्राक्ष, कांदा, डाळिंबच नाही, तर आब्यांचा राजा हापूसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी हापूस आंबा चाखायला मिळतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, प्रयोगशील शेतकऱ्यांनी आंबा पीक वाचवित तो बाजारात खवय्यासाठी उपलब्ध करून िदला आहे. गंगापूररोडवर आकाशवाणी केंद्राजवळ नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या हापूसमुळे परिसरात सुगंध दरवळतोय. परंतु, रत्नागिरी हापूसचा दर ७०० ते १००० रुपये डझन असल्याने उच्चभ्रू वर्ग तो खरेदी करताना दिसून येत आहे.
मार्च महिना लागला की, बाजारातील द्राक्ष अखेरीला येतात आणि हापूसचा सुगंध दरवळायला लागतो. यावर्षी बेमोसमी पावसामुळे द्राक्ष आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने खवय्यांची गैरसोय झाली. त्याचप्रमाणे फळ बाजारात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच आंबा विक्रीला येतो. मात्र, तो केरळ आणि देवगडचा हापूस असल्याने ग्राहक त्याची खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करून रत्नागिरीच्या हापूसची प्रतीक्षा करतात. दोन दिवसांपासून गंगापूररोडवरील भाजीबाजारात रत्नागिरीच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक पध्दतीने पिकविलेला आंबा विक्रीसाठी अाणल्याने खरेदीसाठी आणि दराच्या चौकशीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. गतवर्षी शहरात हापूस, केसर, तोतापुरी, लालबाग, लंगडा, दशहरी या प्रकारचा २२ हजार ३८२ क्विंटल आंबा विक्रीसाठी आला होता. यावर्षी आतापर्यंत २११ क्विंटल आंबा अाला अाहे.
कृत्रिमपणे पिकविलेला नकाे
बाजारातअांबा मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो. मात्र, कृत्रिम पद्धतीने पिकविलेला असतो. यासाठी जास्त पैसे गेले तरी नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा खरेदीला आम्ही पसंती देतो.
संगीताशिंदे, ग्राहक
अांबा पिकविण्यास सात दिवस
नैसर्गिकरीत्या आंबा पिकविण्यासाठी किमान सात दिवस लागतात. तांदळाचा भुसा िकंवा उसाचे चिपाड त्यासाठी लागते.
- अनंतनागवेकर, हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते
नाेटिसा बजावणार...
आंबाहंगाम सुरू झाला असून, शहरातील सर्वच आंबा विक्रेत्यांना नियमानुसार अाणि नैसर्गिक पद्धतीनेच अांबा पिकविलेला असावा, अशा नोटिसा लवकरच पाठविणार अाहाेत.
- के.बी. शेवाळे, उपसचिव, नाशिक बाजार समिती