आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरणबारी ओव्हरफ्लो; आमदार उमाजी बोरसे यांच्या हस्ते जलपूजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले असून, ते पाणी मोसम नदीपात्रात पोहोचत आहे. पूरपाण्यामुळे मोसम खोर्‍यातील पाणी योजनांना जीवदान मिळणार आहे.

आमदार उमाजी बोरसे यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन करण्यात आले. यावेळी हरणबारी धरणाचे पूरपाणी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामध्ये सोडून दुष्काळी परिस्थितीत होरपळणार्‍या जनतेला आधार द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर आमदार उमाजी बोरसे यांनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून तालुक्यातील जनतेला पूरपाण्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. जलपूजनानंतर आमदार बोरसे यांनी डाव्या कालव्याच्या प्रलंबित कामांची पाहणी केली. कामातील अडचणी तातडीने दूर करून पूरपाण्याचा परिसरातील जनतेला लाभ दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या प्रसंगी तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी एच. एस. लोखंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोसम नदीला प्रथमच पूर - हरणबारी धरण पूर्णपणे भरले आहे. धरणातून पाणी ओव्हरफ्लो होत असल्याने मोसम नदीला प्रथमच पूर आला आहे. मालेगाव तालुक्यात शेतीसिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या परिस्थितीत पूरपाणी कोठेही न अडविता ते मालेगावपर्यंत पोहोचल्यास किनार्‍यालगतच्या गावांना फायदा होईल. जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे. स्वाती ठाकरे, सदस्या, जिल्हा परिषद