आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरांचे अस्पृश्यता निवारणाचे कार्य अत्युच्च दर्जाचे : बागडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘ज्यांच्या त्यागाची महती वर्णन करायला शब्ददेखील अपुरे पडतात, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. रत्नागिरीतील कार्यकाळात त्यांनी केलेले अस्पृश्यता निवारणाचे कार्य अत्युच्च दर्जाचे हाेते. त्यामुळेच आपल्या राज्यात जे काही अस्पृश्यता निर्मूलन झाले आहे, त्याचे श्रेय जर कुणाला द्यायचेच असेल तर त्यात सावरकरांचे नाव त्यात त्यात अग्रभागी असेल’, असे प्रतिपादन विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी केले.

भगूर येथे आयाेजित स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समाराेपप्रसंगी ते बाेलत हाेते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेषराव माेरे, वा. ना. उत्पात, श्रीकृष्णबुवा सिन्नरकर, रमेश जलतारे, शंकरराव गायकर, बळवंत लवाटे, चंद्रकांत शहासने, भाऊ सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. या वेळी बागडे यांनी सावरकरांच्या स्मृती टिकल्या आणि वाढल्या पाहिजेत, यासाठी सर्वताेपरी प्रयास करण्याची गरज असल्याचे सांगितले. सावरकरांना स्वातंत्र्याेत्तर काळातही अटकेचा सामना करावा लागला. त्यांच्या तेजाेमय वाङमयावर काही काळ बंदी घातली गेली. अशा अनेक प्रकारे त्यांना स्वातंत्र्यानंतरही अपमान सहन करावा लागल्याचेही बागडे यांनी नमूद केले.

उत्पात म्हणाले, ‘सावरकर यांच्यासारखे अलाैकिक त्याग करणारे कुटुंब जगात दुर्मिळ आहे. सावरकरांनी जर सुटकेसाठी माफी मागितल्याचा कुणी आराेप करत असेल तर ताे त्यांच्या राजनीतीचा भाग हाेता. छत्रपतींनादेखील तीनदा माघार घ्यावी लागली, पण ताेदेखील त्यांच्या राजकारणाचाच भाग हाेता,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

प्रेमींनी अपप्रचार खाेडून काढावेत : माेरे
सावरकर प्रतिगामी हाेते, हिंदुत्ववादी हाेते, जातीयवादी हाेते, माफीवीर हाेते, गांधी हत्येत त्यांचा हात हाेता, असे अनेक गैरसमज हेतुपुरस्सर पसरवले जात आहेत. हा अपप्रचार खाेडून काढण्याची गरज आहे. गांधी हत्येत सावरकरांचा सहभाग नसल्याचे हायकाेर्टानेच स्पष्ट केले आहे. सावरकरप्रेमींनी हे आराेप संपुष्टात आणावेत, असे आवाहन शेषराव माेरे यांनी केले.