आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिहरन यांच्या स्वरांची जादू, दिव्‍य मराठी फेस्‍टीव्‍हलमध्‍ये कर्णमधुर गझलांनी बहरली संध्याकाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कानातून थेट मनात उतरत जाणारा ताेच चिरपरिचित अावाज... खास ‘हरी’शैलीतील अलवार घेतलेल्या ताना... अन् तिन्ही सप्तकात विहरणारा मखमली स्वर, काळजात घुसला अाणि रसिकांची शनिवारची संध्या अायुष्यभरासाठी यादगार करून गेला. भारतीय फ्यूजन संगीतात माेलाचे याेगदान देतानाच गझल गायकीचा वारसा ताकदीने पेलत कानसेन श्राेत्यांच्या मनावर अमीट ठसा उमटवणारे जगविख्यात गायक हरिहरन यांची संगीतसंध्या नाशिककर रसिकांना त्यांचे जणू ‘मनहरण’ झाल्याचीच अनुभूती देणारी ठरली.

‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्ट’च्या निमित्ताने नाशिककरांसाठी हरिहरन यांची स्वर झंकार लाइव्ह म्युझिक काॅन्सर्ट विश्वास लाॅन्सवर अायाेजित करण्यात अाली हाेती. हरिहरन यांच्या एकेक गझलेने श्राेत्यांच्या मनाला घातलेली साद अाणि रसिकांनी अक्षरश: देहभान हरपून दिलेली दाद असा हा साेहळा तब्बल तीन तास रंगला. हरिहरन यांनी घेतलेल्या
हरकतींवर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत मनमुराद दाद दिली.
 
बहाेत अच्छा गा रहे है अाप ... : ‘पधाराेम्हारे देस रे’ या गझलसह काही अन्य गाण्यांवर हरीजींनी प्रेक्षकांनाही त्यांच्या स्वरात स्वर मिसळायला लावले. केवळ स्वरांचे तराने गाऊन तेदेखील गायला प्रेक्षकांना प्राेत्साहित करत सर्व प्रेक्षकांनाच कार्यक्रमात एकरूप करून घेतले. तसेच प्रेक्षकांनी गायल्यावर ‘बहाेत अच्छा गा रहे है अाप’ असे म्हणत दादही दिली.
 
तूही रे अन; जीव रंगला.. : हरिजींनी सादर केलेल्या ‘तू ही रे तेरे बिना मैं केसे जिऊं’, ‘बाहाेंके दरमियां दाे प्यार मिल रहे है’ या गाण्यांवर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तर ‘जीव रंगला’ या गीताला ‘वन्स माेअर’ची दाद मिळाली.
 
मान्यवरांचा सत्कार : हरिहरन यांचा दिव्य मराठीचे सीओओ निशित जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फिनोलेक्स पाइपचे पवन चंद्रात्रे, निखिल राऊत, विश्वास ग्रुपचे विश्वास ठाकूर, अशोका बिल्डकॉनच्या आस्था कटारिया, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर श्री. तांबट, पु. ना. गाडगीळचे सतीश कुबेर, चौधरी यात्रा कंपनीचे अशोक चोधरी, सोनी पैठणीचे संजय सोनी, सपकाळ नॉलेज हबचे रवींद्र सपकाळ, स्वर झंकारचे अतुल उपाध्ये यांच्यासह मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 
रंजिश ही सही, पत्ता पत्ता बुटा बुटा अन‌् दिले नादान...
हरीजींनी प्रारंभ ‘बेकरारी चलन उसकाे बताया’ पासून केली. त्यानंतर ‘वाे भी है मेरी तरह वक्तकी गर्दीश का शिकार’, ‘दिले नादान तुझे हुवा क्या है’, ‘एक सफर है जिंदगी’, ‘अक्स चेहरे पे अाफताब का है’, ‘अजीबसा निहात मुझपर गुजर गया’ ‘रंजिशही सही दिल दुखाने के लिये अा’, ‘जैसे तुझे अाते है, न अाने के बहाने’, ‘ माेहे अपनेही रंग में रंग दे’ , ‘काश एेसा काेई मंझर हाेता, मेरे कांधे पे तेरा सर हाेता’ अाणि ‘लाेग कहते है अजनबी तुम हाे’ या गझला सादर करीत रसिकांना खुश केले.
 
अायुष्यभरासाठी संस्मरणीय
हरिहरन नावाच्या गायकीतील जादूचा करिश्मा ‘याचि देही याचि काना’ने एेकण्याचा अनुपम साेहळा नाशिककर रसिकांनी अनुभवला. त्यांच्या गाजलेल्या गीतांचा हा प्रवास नाशिककरांसाठी संस्मरणीय अनुभव देणारा ठरला.
 
उर्दू ब्लूज अन मिडल इस्ट
हरिजींनी गझल गायनाच्या उत्तर रंगात ‘उर्दू ब्लूज’ नावाचा अनाेखा प्रकार सादर केला. ‘ये अाईनेसे अकेलेमें गुफ्तगू क्या है’ या उर्दू बाेलांना जॅझची जाेड देत त्यांनी सादर केलेल्या अनाेख्या प्रयाेगानेही रंग भरले. त्यानंतर ‘मिडल इस्ट’ या प्रकारात ‘बदन मे अागसा चेहरा गुलाब जैसा’ हादेखील वेगळ्या गायकीचा नमुना पेश करीत हरिहरन यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधत त्यांची मने जिंकली.
 
पुढील स्‍लाइडवर...४० वर्षांनी बाेलावले नाशिकला, पुन्हा येईन आणि कार्यक्रमाचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...