आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हर्ले’ टीमने जिंकले नाशिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देशभरातील आठ राज्यांमधून आलेल्या 120 ‘हर्ले डेव्हिडसन’स्वारांनी शनिवारी नाशकावर स्वारी करून ‘रायडिंग हॉलिडे’चा मनमुराद आनंद लुटला. वेस्टर्न हर्ले ओनर्स ग्रुपच्या वतीने रायडिंगचा थरार अनुभवण्यासाठी नाशिकमध्ये दोन दिवस मुक्काम करत त्यांनी नाशिककरांची मने जिंकली.

महेंद्रसिंह धोनी आणि अभिनेता जॉन अब्राहमदेखील ज्या गाड्यांचे चाहते आहेत, अशा हर्ले डेव्हिडसनच्या 120 बाइक्स शुक्रवारी आणि शनिवारी नाशकात मुक्कामाला होत्या. नाशकात रायडिंगचा थरार अनुभवण्यासाठी जमलेल्या या रायडर्समधील स्वार मुंबई, गुजरात, गोवा, दिल्ली, पंजाब, ओडिशा, कर्नाटक, आसाम या आठ राज्यांमधून आले होते. कुणी दिवसाला 800 ते 900 किलोमीटर, तर कुणी एक हजार किलोमीटरचा वेगवान प्रवास करीत शुक्रवारीच दाखल झाले होते.

शुक्रवारी नाशिकमधील वाइनचा आनंद घेतल्यानंतर या टीमने शनिवारी हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये जल्लोष करत ‘रायडिंग हॉलिडे’ साजरा केला.

..पुन्हा बाहेरचा ध्यास

हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक अंतरावरून आलेल्या रायडर्सनी नाशकात आराम केला. तर मुंबई, गोवा, गुजरात या कमी अंतरावरून आलेल्या रायडर्सपैकी काही स्वारांनी शनिवारी सकाळी नाशकात चहापान केले. धुळ्यात हलका नाश्ता घेत तिथून वार्‍याच्या वेगाने परतत पुन्हा नाशकात भरपेट नाश्ता केला. अवघ्या सव्वा ते दीड तासात एका बाजूचा प्रवास झाला. यावरूनच वेग लक्षात येतो. नाशिकला आलेल्या टीममध्ये कमलेश देसाई, ओटीस डिसूजा, अमेय कपनटाक, अंकुश भान, सुशांत नारकर आदी रायडर्स सहभागी झाले होते.


ही आहेत ‘वेस्टर्न हर्ले ओनर्स’ची वैशिष्ट्ये


वेस्टर्न हर्ले ओनर्स ग्रुपचे रायडिंग हॉलिडेचे हे तिसरे वर्ष
गटातील एकही व्यक्ती मद्य पिऊन गाडी चालवत नसल्याने हुल्लडबाजी होत नाही.
किमान 8 लाख ते कमाल 44 लाखांपर्यंत किंमत एका बाइकची.
20 प्रकारची मॉडेल्स कंपनीच्या बाइकची.
55 हजार रुपये किमतीचे हेल्मेटच या बाइकवरून प्रवास करण्यासाठी उपयुक्त
बाइक रायडरने विशिष्ट प्रकारचे जॅकेट व स्किनटाईट पँट घालणे अत्यावश्यक.