आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलपटू हर्षद पूर्णपात्रेंवर अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाव्हानात्मक सायकल माेहिमा जिद्दीने तडीस नेणारे नाशिकचे सायकलपटू हर्षद श्रीकांत पूर्णपात्रे (३८) यांच्यावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात अाले. शुक्रवारी (दि. ३१) मनाली ते लेह लडाख मार्गावरील सायकल प्रवासात पुरेसा अाॅक्सिजन मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला हाेता.
रविवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह नाशिकमध्ये अाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. त्यांच्या मृत्यूमुळे नाशिक सायकलिस्ट ग्रुपसह सामाजिक वर्तुळातही हळहळ व्यक्त करण्यात येत अाहे. अंत्ययात्रेस सायकलिस्ट असाेसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, वकील संघाचे सदस्य यांच्यासह राजकीय सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अादी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित हाेते. ज्येष्ठ समाजसेवक अाधाराश्रमाचे अाधारस्तंभ डाॅ. श्रीकांत पूर्णपात्रे यांचे हर्षद हे ज्येष्ठ चिरंजीव हाेते.