आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरसूल दंगलीचे लाेण शेजारच्या ठाणापाड्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरसूल येथील दंगलीत घरे, दुकानांची नासधुस करण्यात अाली. त्याची साफसफाई करताना ग्रामस्थ. - Divya Marathi
हरसूल येथील दंगलीत घरे, दुकानांची नासधुस करण्यात अाली. त्याची साफसफाई करताना ग्रामस्थ.
नाशिक- हरसूल गावात मंगळवारपासून उसळलेल्या दंगलीचा उद्रेक काही प्रमाणात कमी झाला असला तरी गुरुवारी हे लाेण जवळच्या ठाणापाडा गावात पाेहाेचले. जाळपोळ आणि लुटमारीचे प्रकार घडल्याने या गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी ४५ जणांना ताब्यात घेण्यात अाले असून, घटनेची तीव्रता पाहता दोन्ही गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात अाली हाेती. तसेच सुमारे हजार पाेलिस बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात अाले अाहेत.

हरसूल गावात चौधरी नावाच्या तरुणाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या दंगलीचे लोण जवळच्याच ठाणापाड्यात पोहाेचले. तेथे गुरुवारी दुपारी काही गावकरी जमले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तरुण ठार झाल्याच्या घटनेबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाठाेपाठ काही घरांवर या जमावाने चाल केली. गृहाेपयाेगी वस्तू लुटून घरांना आग लावली.
घरातील बहुतांशी वस्तू लुटण्यात आल्या. गावानजिक असलेली पोल्ट्री आणि बेकरीही जाळण्यात आली. तत्पूर्वी पाच ते सहा हजार कोंबड्या संतप्त जमावाकडून लांबविण्यात अाल्या. या घटनेची माहिती िमळताच अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला व परिस्थितीवर िनयंत्रण िमळविण्यात अाले. ४० ते ४५ दंगेखोरांना ताब्यात घेण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक जयजित सिंग, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सुमारे हजार पाेलिस हरसूल व ठाणापाड्यात बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात अाले अाहेत.

जखमी पाेलिसांवर उपचार
बुधवारी अटक केलेल्या दंगेखोरांना सोडण्यासाठी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये ४० पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यातील १३ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाळपोळ आणि दंगलीच्या घटनांमुळे बहुतांश रहिवाशांनी हरसूल गाव सोडून गेले अाहेत. त्यामुळे गाव अाेस पडले अाहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ग्रामस्थांना शांततेचे अावाहन केल्यानंतर त्याचा परिणाम काही तासच जाणवला. पालकमंत्र्यांनी पाठ फिरवताच परिस्थिती जैसै झाली.
बातम्या आणखी आहेत...