आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरसूल दंगलीस कारणीभूत पाेलिस अधिकारी माेकळेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सलगचार ते पाच दिवस धगधगत राहिलेल्या हरसूल येथे लाेकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय नेतेमंडळींपासून ते पालकमंत्री, गृहराज्यमंत्र्यांचे दाैरे अाटाेपून गावाची परिस्थिती पूर्वपदावर अाली खरी. परंतु, या दंगलीमागच्या नेमक्या सूत्रधाराचा शाेध अद्याप यंत्रणेला लागत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण कायम अाहे. ज्यांच्या शिरावर ग्रामस्थांच्या सुरक्षिततेची जबाबदारी अाहे, त्याच पाेलिस खात्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याने दाखविलेला निष्काळजीपणा अाणि उद्दामपणाच या संपूर्ण प्रकरणामागे कारणीभूत असल्याचे दिसून येत अाहे. त्याचबराेबर जमावाला भडकविण्याचे काम करणारेही अद्याप माेकळेच असल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.
जिल्ह्यातील पूर्णपणे अादिवासी तालुक्यातील अाणि माेठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या हरसूल गावाचा इतिहास बघता कधीही जातीय तणावातून वाद निर्माण झालेले नव्हते. या गावात सर्वच प्रकारच्या जातीधर्माचे कुटुंबीय माेठ्या संख्येने गुण्यागाेविंदाने राहात हाेते. गत दाेन ते अडीच दशकात या गावात एकही धर्माच्या नावाखाली दंगल झाल्याची पाेलिस दप्तरी नाेंद नाही. गावात दाेन वर्षांपासून नाशकात मटका, जुगार, बनावट मद्य निर्मिती, विक्री करणाऱ्या धंदेवाल्यांनी व्यवसाय थाटल्याची चर्चा अाहे. या व्यावसायिकांना विशिष्ट राजकीय नेत्यांचे संरक्षण मिळत हाेते. याबाबत अधूनमधून तक्रारीही हाेत हाेत्या. यंत्रणेने वेळीच गावातील राजकीय नेते, व्यापारी अाणि ज्यांच्यावर गावाची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी टिकून अाहे, अशा अादिवासी मंडळींना एकत्रित बसवून शांतता, सलाेखा नांदण्यासाठी बैठका घेणे गरजेचे हाेते. ज्यावेळी युवकाचा मृतदेह अाढळून अाला, त्यानंतर सरपंचांनी स्वत: सहायक निरीक्षक रावसाहेब कीर्तीकर यांना गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊन सुरक्षितता धाेक्यात येऊ शकते, त्यासाठी जादा बंदाेबस्त नेमण्याची मागणी पत्राद्वारे केली हेाती. तरीही यंत्रणेकडून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या ध्वजपर्वाचे कारण पुढे करीत दुर्लक्ष करण्यात अाले.

सहायक पोलिस निरीक्षकाची बदली
यादंगलीत प्रथमदर्शनी दाेषी अाढळून येत आलेल्या सहायक निरीक्षक कीर्तीकर यांची मुख्यालयी बदली झाली आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या दाैऱ्यानंतर लागलीच िवधिमंडळाच्या अधिवेशनात त्याची घाेषणा हाेण्याची शक्यता अाहे. दरम्यान, लाेकप्रतिनिधी, मंत्र्यांचे दाैरे हाेऊनही खऱ्या दंगेखाेरांना शासन अाणि दंगलीत हाेरपळलेल्या सामान्य रहिवासी, व्यापाऱ्यांचे लाखाेंचे नुकसान कसे भरून निघणार, याबाबत सरकारी मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.

लाेकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत अाहे. यामध्ये हरसूल, त्र्यंबकसह कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यातील माेठी गावे, खेड्यापाड्यांवर मटका, बनावट मद्य, गावठी दारूच्या भट्ट्या लागलेल्या दिसतात. गावाच्या प्रवेशद्वारांवर तर कुठे सार्वजनिक शाैचालये, स्मशानभूमी, रिक्षा, जीप थांब्यांवरही जुगाराचे अड्डे सुरू झाल्याचे दिसते. या दंगलींनतर या अवैध धंद्यांवरही वेळीच कारवाई झाल्यास त्यातूनही तणाव निर्माण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बातम्या आणखी आहेत...