आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलंद ‘हौसला’. अन् गवसले शिखर ; मानवोत्थान मंच आणि इकोड्राइव्ह यंगस्टर्सतर्फे शारीरिक मानसिक अपंगांसाठी मॅरेथॉन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कोणी मल्लखांब करून दाखवत होतं, तर कोणी भांगडा करत होतं.. कोणी गोफ विणत होतं तर कोणी लेझीमचं प्रात्यक्षिक करून दाखवत होतं..पावसाची संततधार सुरू होती आणि कमतरतेवर मात करत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अपंग विद्यार्थी ‘हौसला’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे सारे दृश्य पाहून नाशिककरांची रविवारची सकाळ खर्‍या अर्थाने स्फूर्तिदायक झाली.
मानवोत्थान मंच आणि इकोड्राइव्ह यंगस्टर्स या संस्थांतर्फे आयोजित हौसला मॅरेथॉन वॉकमध्ये नाशिक जिल्ह्य़ातील तब्बल हजारहून अधिक शारीरिक आणि मानसिक अपंग विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात हरिश बैजल, जलतरणपटू हंसराज पाटील उपस्थित होते.