Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Havey Rain In Nashik

सलग चाैथ्या दिवशीही मुसळधार, बाणगंगेला पूर; दात्याणे, अाेणे, शिलेदारवाडीशी तुटला संपर्क

प्रतिनिधी | Oct 12, 2017, 09:23 AM IST

नाशिक-नाशिक शहरासह जिल्ह्यात परतीचा मान्सून गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार बरसत अाहे. त्यामुळे शहरातीला जनजीवन दरराेज दुपारनंतर ठप्प हाेत अाहे.

दिंडोरीसह निफाड तालुक्यात बाणगंगेला पूर अाला या नदीवरील तीन पूल पाण्याखाली गेल्याने ओझर-सुकेणा रस्ता बंद झाला. त्यामुळे दात्याणे, शिलेदारवाडी, ओणे या गावांचा संपर्क तुटला. जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठीही नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

या पिकांचे झाले नुकसान
जिल्ह्यातील चार दिवसांच्या पावसामुळे द्राक्ष अाणि ऊस या नगदी पिकांबराेबरच मका, टाेमॅटाे, काेबी, फ्लाॅवर, गाजर, काेथिंबिर, मेथी, पालक, मुळा या भाज्यांचेही नुकसान झाले अाहे.

सलग पाचव्या दिवशी पाऊस; २० मिलिमीटर
शहरातसलग पाचव्या दिवशी, बुधवारी (दि. ११) पावसाने जाेरदार हजेरी लावली. दुपारी एक वाजेपासून जाेरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर काहीकाळ विश्रांती घेऊन सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ताे पुन्हा बरसला. हवामान केंद्रात २०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परतीच्या पावसाने नागरिकांना हैराण केले अाहे. दिंडोरी, कळवण, निफाड, सिन्नर, नाशिक, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही पाऊस सुरू असून भाजीपाल्याचे नुकसान होत असल्याने भाजीपाल्याचे दर वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पाऊस सध्या विशेषत: टोमॅटोचे जास्त नुकसान करीत अाहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टाेमॅटाे बुधवारी ४०० रुपये प्रतिक्रेट विकला गेला. किरकोळ बाजारात टोमॅटो २० ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मेथी, कोथिंबीरला २० ते २५ रुपये प्रतिजुडी भाव आहे. दोन दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास भाजीपाल्याची आवक घटून दरात वाढ होण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.

शहरातील रस्त्यांवर जागोजागी पाण्याची डबकी साचली हाेती. धरणक्षेत्रामध्येही जाेरदार पाऊस होत असल्याने गंगापूर, दारणाधरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बुधवारीही गोदावरीला पूर आला होता. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर अाल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसाने चांगलीच फजिती हाेत अाहे. ग्राहकांची प्रतीक्षा करणाऱ्या व्यावसायिकांचा त्यामुळे हिरमाेड हाेत आहे. नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प, पंचवटी, काॅलेजरोड, इंदिरानगर, सातपूर, सिडको, कामटवाडे, गंगापूररोड या परिसरात पाऊस झाला.

Next Article

Recommended