आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजाराची लाच घेताना मुख्याध्यापिकेला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शाळेचे दाखले देण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजाराची लाच घेताना बजरंगवाडी येथील शाळा क्रमांक च्या मुख्याध्यापिका शैला प्रतापराव मानकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बजरंगवाडी येथे तक्रारदाराचे तीन मुले शिक्षण घेतात. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सावित्रीबाई फुले विद्यालय, हॅपी होम कॉलनी या शाळेत प्रवेश घेतला होता. मात्र, शाळा सोडल्याचा दाखला विद्यालयात जमा केला नव्हता. त्यामुळे तक्रारदार यांना विद्यालयाने दाखला मिळण्यासाठी पालिका शाळेसाठी पत्र दिले होते. हे पत्र घेऊन तक्रारदार मुख्याध्यापिका शैला मानकर यांच्याकडे गेले. दाखला देण्याकरिता विनंती केली. मुख्याध्यापिका मानकर यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे तीन दाखल्यांची १५०० रुपयांची लाच मागतली. तडजोडीअंती एक हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. पथकाने शाळा क्रमांक मध्ये सापळा रचून मुख्याध्यापिकेला हजाराची लाच स्वीकारताना प्रत्यक्ष अटक केली.
बातम्या आणखी आहेत...