आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या फीसाठी मुख्याध्यापकाने जिल्हा बँक शाखेत घेतले कोंडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुलीचे महाविद्यालयातील कॉलेजचे शुल्क भरण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतून काढलेल्या कर्जाचे पैसे मिळवण्यासाठी महिनाभरापासून बँकेत खेटा मारूनही हाती छदामही लागत नसल्याने संतापलेल्या मुख्याध्यापकाने पंचवटी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत स्वत:ला सपत्नीक कोंडून घेतले. हक्काचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत बँक कर्मचाऱ्यांनाही बाहेर जाऊन देणार नाही, अशी भूमिका घेत दिव्यांग असलेल्या शिक्षकाने कोंडून घेतले. बँक व्यवस्थापक अधिकाऱ्यांशी वाद झाल्याने संतापलेल्या शिक्षकाने आत्महत्या करण्याचा इशारा दिला. अखेर वरिष्ठांकडून गुरुवारी (दि. २७) पैसे देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्या शिक्षकाने माघार घेतली. 
 
गाळोशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या प्रमोद लोखंडे यांना मुलगी ईश्वरी हिच्या पदवीच्या शिक्षणासाठी पैशांची गरज भासल्याने भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून त्यांनी तीन लाखांचे कर्ज काढले. या कर्जाची रक्कम पंचवटी येथील एनडीसीसी बँकेच्या शाखेत जमा झाली. पंचवटी येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीच्या शुल्काचे पैसे देण्यासाठी ७० हजार रुपयांचा धनादेश दिला. परंतु, दोन वेळा धनादेश जमा करूनही तो जमा झाला नाही. तसेच आरटीजीएस करूनही पैसे वर्ग झाले नाही. धनादेश वटल्याने लोखंडे यांना दंडही भरावा लागला. बँकेत खेट्या मारूनही पैसे मिळत नसल्याने संतापलेल्या लोखंडे यांनी बुधवारी सायंकाळी पत्नीसोबतच शाखेतच ठिय्या मांडला. हक्काचे पैसे मिळत नाही तोपर्यंत बाहेर जाणार नाही, अशी थेट भूमिका घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. बँक व्यवस्थापक धनंजय धनवटे यांच्याशी वादही झाला. अखेर बँकेच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर धनवटे यांनी गुरुवारी (दि. २७) पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर लोखंडे यांनी माघार घेत शाखा सोडली. दरम्यान, गुरुवारी पैसे मिळाल्यास बँकेच्या शाखेतच आत्महत्या करण्याचा इशाराही लोखंडे यांनी दिला. 
जिल्हा बँकेच्या पंचवटी शाखेचे व्यवस्थापक बँकेच्या वरिष्ठांशी मुख्याध्यापकांचा सुरू असलेला वाद. 

मुलीच्या फीसाठी पीएफमधून काढलेले कर्ज जिल्हा बँकेच्या पंचवटी शाखेत जमा झाल्यानंतर महिनाभर खेटा घालूनही ती रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या मुख्याध्यापकाने बुधवारी बँकेत स्वत:ला असे कोंडून घेतले. 
बातम्या आणखी आहेत...