आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लास्ट संडे’तून अानंदी, निराेगी महिनाअखेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांत आरोग्यविषयक जनजागृती हाेण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून शहर पोलिस प्रशासनाच्या ‘लास्ट संडे ऑफ मन्थ’ या अभिनव उपक्रमास रविवारी (दि. २३) शानदार प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसह बच्चेकंपनी, व्यायामप्रेमींसह विविध कलागुण असलेल्या कलाकारांनी या उपक्रमात उत्साहात सहभाग नोंदवला. पोलिस बँडवर अधिकाऱ्यांसह सर्वांनी ठेका धरत सुटीचा आनंद लुटला.
उपक्रमाची सुरुवात डॉ. सिंघल आणि महिला बालकल्याण सचिव विनिता सिंघल यांच्या उपस्थितीत सकाळी ६.३० वाजता झाली. आसारामबापू पूल परिसरात आयोजित धावण्याच्या स्पर्धेत डॉ. सिंघल कुटुंबीयांसह सहभागी झाले. शहरात व्यायामप्रेमींसहमॅरेथॉन, सायकलिंग, क्रीडाप्रेमींची संख्या वाढत आहे. हा उपक्रम सर्वांसाठी लाभदायी ठरेल. असा विश्वास डॉ. सिंघल यांनी व्यक्त केला. येथे नियमित येथे येण्याची इच्छा काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
उपआयुक्त दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, विजय पाटील, सहायक आयुक्त सचिन गोरे, जयंत बजबळे यांच्यासह पोलिस कर्मचारी ‘रन’ मध्ये सहभागी झाले होते.
...अन‌् अधिकारी थिरकले
पोलिस बँडवर संगीताचा दणदणाट सुरू झाल्यानंतर उपआयुक्त दत्तात्रेय कराळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी ठेका धरला. सुटीच्या दिवशी सकाळी अशा उपक्रमाचा अनुभव अधिकाऱ्यांसह कर्मचारी-नागरिकांना वेगळाच आनंद देऊन गेला.

सुटीचा आनंद लुटला...
^या उपक्रमाने पोलिस नागरिकांमधील दरी दूर होणार अाहे. महिन्याचा शेवटचा रविवार हा उपक्रम पोलिसांसह नागरिकांना नक्की आनंद देणारा ठरेल. गोदाकाठावरील नयनरम्य सकाळ आनंददायी ठरली. -डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त

बातम्या आणखी आहेत...