आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलिंग सुरू करण्यापूर्वी करा अाराेग्य तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धावणे किंवा सायकलिंग सुरू करण्यापूर्वी अाराेग्य तपासणी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. कुणाल गुप्ते यांनी केले. राेटरी क्लब अायाेजित ‘रेस अॅक्राॅस अमेरिका’ कार्यक्रमात मंगळवारी (दि. ४) राेटरी क्लब येथे डाॅ. गुप्ते बाेलत हाेते. या वेळी व्यासपीठावर नाशिक सायक्लिस्ट असाेसिएशनचे अध्यक्ष विशाल उगले, क्लबचे अध्यक्ष विवेक जायखेडकर अाणि सचिव अनिल सुकेणेकर उपस्थित हाेते.

डाॅ. गुप्ते पुढे म्हणाले, पाश्चात्य देशात सायकलिंग रुजल्याने तेथील लाेकांना सायकल चालविण्याच्या नियमांची माहिती अाहे. मात्र, भारतात सायकलिंग पुरेशी रुजलेली नाही. त्यामुळे सायकल चालविण्याच्या नियमांचा अभ्यास करूनच सायकलिंग करावी. यावेळी अमेरिकेतील ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ ही सायकल स्पर्धा जिंकणाऱ्या डॉ. हितेंद्र डॉ. महेंद्र महाजन यांचा राेटरीतर्फे सत्कार करण्यात अाला.

अाराेग्य उत्तम राखण्यासाठी सायकलिंग महत्त्वाची...
काही वर्षांपासून नाशिकमध्ये तरुणाई, उद्याेजक, व्यावसायिक सायकलिंगकडे वळू लागले अाहेत. उत्तम अाराेग्य राखण्यासाठी सायकलिंग महत्त्वाचा व्यायाम प्रकार ठरला अाहे. मात्र, सायकलिंग सुरू करताना प्रथम अाराेग्य तपासणी करून डाॅक्टरांचा सल्ला घेणे हितावह ठरते. त्यामुळे पाठीचे दुखणे, पायाचे विकार हृदयविकार टाळले जाऊ शकतात. अाराेग्य तपासणी करताच सायकलिंग केल्याने हृदयविकाराच्या झटक्याने सायकलपटूंना अापले प्राण गमवावे लागल्याचे डाॅ. गुप्ते यांनी सांगितले.

सायकलपटूंसाठी उपयुक्त मार्गदर्शन
सायकलिंगच्या क्षेत्रात नाशिकचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकविणाऱ्या डाॅ. हर्षद पूर्णपात्रे यांचा काही दिवसांपूर्वी लेह-लडाख मार्गावर सायकल प्रवासादरम्यान अाॅक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला हाेता. तसेच काही महिन्यांपूर्वी सायकलिंग करतानाच उद्याेजक दिलीप काेठावदे यांचाही मृत्यू झाला हाेता, या पार्श्वभूमीवर डाॅ. कुणाल गुप्ते यांनी सायकलपटूंना दिलेल्या या टिप्स अतिशय उपयुक्त अशा अाहेत.
नियमितपणे अाराेग्य तपासणी करा.
भाेजनात सकस अाहार घ्यावा.
जागण्याची सवय ठेवा.
प्रशिक्षकांच्या निरीक्षणातच सुरू करावी सायकलिंग.
रक्तदाबाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी सायकलिंग टाळावी.
सायकलिंगसाठी व्यायामात सातत्य ठेवा.
प्रशिक्षकांच्या सल्ल्याने सायकलची निवड करावी.