आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाराेग्य विभागाकडून ‘मुन्नाभाईं’ना ‘डिस्चार्ज’...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्या बोगस डॉक्टरांची संख्या शहरात वाढली आहे. डॉक्टर असल्याचे सांगून पेशंटला लुबाडणाऱ्या या ‘मुन्नाभाईं'वर कारवाई करण्याची जबाबदारी असलेले पालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत अाहे. चार-पाच महिन्यांतून सवडीनुसार एखादी कारवाई करायची. त्यात अाढळलेल्या ‘मुन्नाभाईं’वर कारवाई करता अभय द्यायचे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी अधिकृत डाॅक्टरांकडून येत अाहेत. नुकत्याच एका बाेगस डाॅक्टर प्रकरणी पाेलिसांना वैद्यकीय अधीक्षकांनी कारवाई करण्याचे पत्र दिल्याने संशय बळावला अाहे. शहरातील विविध भागात बस्तान मांडून असलेल्या या ‘मुन्नाभाईं’विषयी

डॉक्टरहे साक्षात ईश्वराचेच रूप मानले जाते. त्यांच्यावरील विश्वासामुळेच अनेकदा रुग्ण कुठल्याही प्रकारची शहानिशा करता डाेळे झाकून उपचार करून घेतात. मात्र, रुग्णांच्या याच अज्ञानाचा फायदा घेत अनेक मुन्नाभाईंनी सफाईदार पद्धतीने आपले डॉक्टरकीचे बस्तान बसविले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने डॉक्टरांच्या दवाखान्यांची तपासणी केली जात असते. मात्र, कारवाई करण्यात अालेल्या डाॅक्टरांची संख्या नगण्यच अाहे. अाराेग्य विभागाने मागील वर्षभरात फक्त दाेनच डाॅक्टरांविरुद्ध पाेलिसांत गुन्हा दाखल केला अाहे. यातील एक प्रकरण सातपूर, तर दुसरे कामगारनगर येथील अाहे. अशा काही बाेगस डाॅक्टरांविषयी ‘डी.बी. स्टार’कडे अालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चमूने शहरातील विविध भागांत केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव उघडकीस अाले अाहे.

बाेगसडाॅक्टरांकडून फसव्या जाहिरातींवर दिला जाताे भर
कुठल्याहीअाराेग्य विद्यापीठाची परवानगी नसलेले बाेगस डाॅक्टर फक्त तज्ज्ञ डाॅक्टरांकडे केलेल्या कामाच्या जाेरावर शहरांतील झाेपडपट्टी परिसरात अापला व्यवसाय थाटतात. यासाठी अनेकदा सार्वजनिक शाैचालयांमध्ये पाेस्टर चिकटवून ‘गुप्तराेगावर गॅरेंटेड इलाज’ अशी जाहिरातही केली जाते. या जाहिरातींना भुलून, तसेच लाजाळू स्वभावामुळे कुणाचाही सल्ला घेता व्याधीग्रस्त रुग्ण अशा मुन्नाभाईंशी संपर्क साधतात अन् त्यांनी केलेल्या विनाअाॅपरेशन गॅरेंटेड इलाजाच्या जाहिरातीमुळे व्याधीमुक्तीसाठी हजाराे रुपये मुन्नाभाईंच्या खिशात घालतात. हा व्यवसाय करणाऱ्यांनी पालिका प्रशासनाचा ससेमिरा टाळण्यासाठी परराज्यातील पदवी क्लिनिकबाहेर झळकवलेली असते. यातील बहुतांश पदव्या काेलकाता बिहार राज्यातील असल्याचेही ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.

‘तेरीभी चूप अाैर मेरी भी चूप’ असाच सारा प्रकार...
काहीमहिन्यांपूर्वी महापालिकेत माकपचे गटनेते तानाजी जायभावे यांनी वैद्यकीय िवभागाचे कर्मचारी असल्याचे सांगत बाेगस डाॅक्टरांच्या पदवी तपासणीच्या नावाखाली सुरू असलेला गाेरखधंदा उघडकीस अाणला हाेता. माेठा गाजावाजा झाल्यावर संबंधित प्रकरणातील तिघांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात अाले हाेते. मात्र, या प्रकरणाशी संबंधित असलेले कथित बाेगस डाॅक्टर अाणि अशा तपासणीला कथित प्राेत्साहन देणारे वैद्यकीय िवभागातील वरिष्ठांवर काेणतीही कारवाई करण्यात अालेली नाही. एकंदरीतच ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असाच काहीसा हा प्रकार असल्याचे िदसून येते.
महाराष्ट्र मेडिकल काैन्सिलकडे नाेंदणी असलेलेच अधिकृत डाॅक्टर ठरवले जात असताना, शहरात अाजघडीला मात्र काही बाेगस डाॅक्टर्स पश्चिम बंगाल, िबहार राज्यातील डिग्री दाखवून दवाखाने चालवत अाहेत. मनपाने या बाेगस प्रमाणपत्र असलेल्या डाॅक्टरांवर कारवाई केली हाेती.
थेट प्रश्न
- शहरातीलकिती बाेगस डाॅक्टरांवर कारवाई केली अाहे?
अात्तापर्यंतदाेन बाेगस डाॅक्टरांविरुद्ध पाेलिसांत तक्रार करण्यात अाली अाहे.
- बाेगसडाॅक्टरांचा शाेध घेण्यासाठी अापल्या विभागामार्फत कधी माेहीम राबविण्यात अाली का?
तक्रारअाल्यानंतर तक्रारदाराने नमूद केलेल्या डाॅक्टरांची तपासणी करताे, त्यात बाेगस असल्याचे अाढळून अाल्यास पाेलिसांना कारवाईचे पत्र देताे.
- चुंचाळे शिवारातीलडाॅक्टरविरुद्ध तक्रार केली हाेती? नंतर तक्रार मागे का घेतली?
चंुचाळेशिवारात वैद्यकीय पदवी नसलेल्याकडून रुग्ण तपासणी करण्यात येत असल्याचे अामच्या पथकाच्या निदर्शनास अाले हाेते. त्यामुळे पाेलिसांना कारवाईचे पत्र दिले हाेते. मात्र, त्यांच्या पत्नी डाॅक्टर असून, त्यांनी पतीकडे इलेक्ट्राेपॅथीची पदवी असल्याचे कागदपत्र दाखविल्याने अॅलाेपॅथी उपचार करणार नसल्याचे लेखी दिल्याने तक्रार मागे घेण्यात अाली.

‘अायएमए’च्या माध्यमातून पाठपुरावा
बाेगसडाॅक्टरांबाबत नागरिकांनीच सतर्क राहण्याची गरज अाहे. अशा डाॅक्टरांच्या क्लिनिकबाहेर जे फलक लावलेले असतात, त्यावर काेणती डिग्री लिहिलेली अाहे, याची याेग्य व्यक्तींकडे चाैकशी करूनच त्यांच्याकडून उपचार घ्यायला हवेत. अाम्ही ‘अायएमए’च्या माध्यमातून या संदर्भात अनेकवेळा पाठपुरावा केला अाहे. डाॅ.सुधीर शार्दुल, वैद्यकीय अधीक्षक, इएसअाय
डाॅ. बी. अार. गायकवाड, पालिकेचेवैद्यकीय अधीक्षक

एमएमसीकडे नाेंदणी असलेलेच डाॅक्टर
महाराष्ट्रमेडिकल काैन्सिलकडे नाेंदणी असलेलेच डाॅक्टर अधिकृत असतात. काैन्सिलकडे डाॅक्टर, नर्सिंग फार्मसिस्ट यांची नाेंदणी केली जाते. केंद्राच्या कायद्यानुसार एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस अर्थातच अॅलाेपॅथी, अायुर्वेद, हाेमिअाेपॅथी युनानी यांनाच अधिकृत परवानगी अाहे. उर्वरित डाॅक्टर बाेगस डाॅक्टरांच्या संज्ञेत माेडतात. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६६३ दवाखाने हाॅस्पिटलची नाेंदणी करण्यात अालेली अाहे. यातील ३२३ दवाखाने बंद करण्यात अाल्याने १३४० अधिकृत दवाखाने, क्लिनिक, हाॅस्पिटलद्वारे रुग्णसेवा केली जात अाहे. त्याचप्रमाणे १९० साेनाेग्राफी सेंटरपैकी १८६ केंद्राची पालिकेच्या वतीने तपासणी करण्यात अाली अाहे. दर तीन महिन्यांनी अशा प्रकारची तपासणी केली जाते.

अगाेदर कारवाई अन् मग माघारीचे पत्र
महापालिकेच्याअाराेग्य विभागाने नुकतेच सातपूर विभागातील चुंचाळे शिवारात सुरू असलेल्या एका महिला डाॅक्टरच्या हाॅस्पिटलमध्ये अचानक छापा टाकला. या छाप्यात काेणतीही वैद्यकीय पदवी नसताना महिला डाॅक्टरचा पतीच रुग्ण तपासणी करताना पथकाला अाढळून अाला हाेता. पथकाने याबाबत चाैकशी करून अावश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली असता पतीने डाॅक्टर असल्याबाबतचे पुरावे दाखविण्यास असमर्थता दर्शविली हाेती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे पत्र पालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सातपूर पाेलिसांना दिले. पाेलिसांनीही नागरिकांच्या अाराेग्याशी संबंधित गंभीर विषय असल्याने तातडीने तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या हाती काही धागेदाेरे लागण्यापूर्वीच महापालिकेला संबंधित डाॅक्टर पत्नीने अापले पती पुन्हा कधीच अॅलाेपॅथी उपचार करणार नाहीत, या अाशयाचे विनंती पत्र दिले. तसेच काही कागदपत्रे जमा केली. या िवनंतीवरून महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांनी तत्काळ पाेलिसांना दुसरे पत्र देऊन काही कागदपत्रे दाखविण्यात अाल्याचे सांगत संबंधित डाॅक्टरवरील कारवाई मागे घेण्यास सांगितले. एकंदरीतच या सर्व प्रकारावरून महापालिकेच्या भूमिकेविषयी तर संशय बळावू लागला अाहेच. परंतु, लाेकांच्या जीवाशी उघडपणे खेळणाऱ्या या ‘मुन्नाभाईं’ना पालिकेकडूनच अभय मिळत असल्याचीही चर्चा सुरू अाहे.