आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य मंत्र जपत निघाली पांडुरंग दर्शनाला सायकलवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नाशिक सायक्लिंग क्लबने नाशिक ते पंढरपूर अशा सायकल प्रवासाचे आयोजन केले असून, 363 किलोमीटर अंतर पार करत हे सायकल वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. सिन्नर महाविद्यालयात या सायकल दिंडीचे आगमन झाल्यानंतर मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे, रामभाऊ लोणारे आदींसह ढग्या डोंगर मित्रमंडळाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.
पोलि स प्रशिक्षण अकॅडमीचे हरीश बैजल, अध्यक्ष विशाल उगले, सिन्नर महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, डॉ. सयाजीराव गायकवाड, राजेंद्र ठाकरे, शैलेश राजहंस, अ‍ॅड. शेटे, किशोर काळे, संदीप जाधव, दिनेश शिर्के, विजय पाटील, दत्तात्रय आंधळे, नंदू कासलानी या पुरुषांबरोबरच यामिनी खैरनार, प्रतिभा आहेर, डॉ. रौंदळ, प्रिया आहेर आदी महिलाही या वारीत सहभागी झाल्या आहेत.
बारा वर्षांच्या बालकांपासून पासष्ट वर्षांच्या वृद्धांपर्यंतच्या या वारक-यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. स्वागताप्रसंगी सायकलवारीतील सदस्यांनी पर्यावरण संदेश आणि आरोग्याचा मंत्र सिन्नरकरांना देत पंढरपूरकडे प्रस्थान केले.