आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचे 54, साथीचे रोज 1200 रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा रुग्णालयासह डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, गंगापूर हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले रुग्णालय, अण्णासाहेब दातार हॉस्पिटल, सिडको दवाखाना, जे. डी. सी. बिटको हॉस्पिटल, तसेच खासगी रुग्णालयांतील रुग्णसंख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. एका रुग्णालयात रोज सुमारे 1200 रुग्ण तपासले जात आहेत. त्यात महिला व बालकांची संख्या अधिक आहे. शहरात डेंग्यूचे तब्बल 54 रुग्ण आढळल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे चित्र आहे.

भद्रकाली मार्केट, गंजमाळ बसस्थानक परिसरातील झोपडपट्टीला अस्वच्छतेचा विळखाच पडला आहे. भाजी मार्केटमध्ये ओला व सुका कचरा, तसेच झोपडपट्टी परिसरातील चेंबर तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिकरोडसह इतरत्रही अशीच स्थिती आहे. अनेक ठिकाणी घंटागाडीच येत नसल्याने नागरिक त्रास झाले आहेत.

दक्षता गरजेची
लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी. उकळलेले पाणी प्यावे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. स्वच्छता ठेवावी. - डॉ. सोनू तोलानी

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे
स्वच्छता कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला हवे. - प्रा. एजाज खान, नागरिक

फवारणी करणे गरजेचे
मलेरिया विभागाने शहरात सर्वत्र फवारणी केल्यास डासांची उत्पत्ती थांबू शकेल. महापालिकेने ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणांवर कचराकुंडी ठेवावी. - स्नेहल गांगुर्डे, प्राध्यापक

चार हजारांवर रुग्णांची तपासणी
विविध रुग्णालयांमध्ये महिनाभरात सुमारे चार हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी झाली आहे. गेल्या महिन्यात सुमारे तीन हजार रुग्ण तपासले होते. मलेरिया, खोकला, सर्दी, घसा दुखणे, तसेच साथीच्या आजारांचे सुमारे 80 रुग्ण दाखल आहेत. डॉ. एन. आर. भोये, झाकीर हुसेन हॉस्पिटल