उन्हाळा आला की, अनेकांची पावले आपसूकच शीतपेयांकडे वळतात. मात्र, ही शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणा-या बर्फाच्या गुणवत्तेबाबत जराही शंका कुणाला येत नाही. प्रत्यक्षात बर्फाच्या कारखान्यांसमोर ‘अखाद्य बर्फ’ असा फलक असूनही काही व्यावसायिक स्वार्थापोटी हा बर्फ आणून त्याचा वापर शीतपेयांसह बर्फाचे गोळे तयार करण्यासाठी करतात. ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना जराही थांगपत्ता नसतो. जनतेच्या आरोग्याची जबाबदारी वाहणा-या अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागानेही झोपेचे सोंग घेतल्याने नाशिककरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचेच दिसून येत आहे.
बर्फाचे उत्पादन करणा-या कारखान्यांत काही ठिकाणी दर्शर्नी भागातच ‘अखाद्य बर्फ’ म्हणून उल्लेख केलेला दिसतो. त्यामुळे असा बर्फ तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जात असेल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो जास्त काळ टिकावा, यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते.
प्रशासनाचा अंकुशच नाही
बर्फाच्या पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासणे गरजेचे असताना अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग तसे करताना दिसत नाही. दर पाच वर्षांनी बर्फ बनविण्याचे लोखंडी डबे बदलण्याचा कारखानदारांचा दावा आहे. मात्र, त्याची तपासणी होत नाही. हे डबे खराब झाल्यास त्यामधील बर्फ खाणे धोकादायकच असते. असे असतानाही प्रशासन बघ्याचीच भूमिका घेताना दिसते. कारखान्यामधील कर्मचा-यांनी हॅण्डग्लोव्हज् वापरणे बंधनकारक आहे. दर तीन महिन्यांतून त्यांच्या आरोग्याची तपासणी होणेही आवश्यक असते. मात्र, विभागाचा कुठलाही अंकुश नसल्याने सारे काम बिनधोकपणे सुरू आहे. विभागाने उत्पादकांसोबत बर्फाचा वापर करणारे ज्यूसचे गाडे, गोळे विक्रेत्यांचीही तपासणी करणे गरजेचे आहे.
वाचा कसा होतो बर्फाचा वापर....