आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Heart Festival 2014 Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिककरांनी अनुभवला झूम झूम झुम्बा, हार्ट फेस्टिव्हल 2014 मध्ये नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कधी वॉक तर कधी योगा. सकाळच्या प्रफुल्लित वातावरणात मराठी व हिंदी गीतांपासून ते वेस्टर्न नृत्याच्या तालावर आबालवृद्धांनी झुम्बा नृत्य करत आरोग्यदायी जीवनाची अनुभूती घेतली. निमित्त होते, नाशिक हार्ट फेस्टिव्हलचे. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकरसह प्रज्ञाज् हेल्दी वुमन झुम्बा फिटनेसच्या सहकाऱ्यांनी नाशिककरांना झुम्बाच्या विविध टिप्स देत तणावमुक्ती जीवनाचे धडे दिले.
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर व मविप्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनानिमित्त रविवारी गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. झुम्बा विथ वर्षा उसगावकरने सादर केलेल्या नृत्यात तरुण-तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रंग भरला. प्रारंभी वर्षा उसगावकर यांनी केटीएचएमच्या आवारात वॉक केला. याप्रसंगी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अजय बोरस्ते, कोंडाजी आव्हाड, मुरलीधर पाटील, आरजे भूषण मटकरी आदी उपस्थित होते. हार्ट फेस्टिव्हल अंतर्गत उपस्थितांना तीन हजार कॅप्सचे वाटप करण्यात आले. तसेच मोफत रक्तशर्करा तपासणीही करण्यात आली. बदलेल्या जीवनशैलीच्या काळात श्रम परिहार होत नसल्याने शारीरिक ऊर्जा बाहेर पडत नाही. शरीराची हालचाल कमी झाल्याने स्थूलतेचे प्रमाणही वाढत आहे. असमतोल आहार व मानसिक ताणतणावामुळे हृदयाचे विकार वाढले आहेत. ते टाळण्यासाठी नियमित व्यायाम हवा. तंदुरुस्तीमधून तर आरोग्यदायी जगता येत असल्याने व्यायाम व योगाचे महत्त्व पटवून देणाऱ्या झुम्बाला नाशिककरांनी प्रतिसाद दिला.
झुम्बा विथ वर्षा..
मी आले...अशी जोरदार साद घालत अभिनेत्री वर्षाने नाशिककरांना झुम्बाच्या तालावर थिरकवले. झुम्बाच्या विविध प्रकारांची माहिती देत वर्षा उसगावकरने हेल्दी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. ह्यबेबी डॉल व ब्लू है पाणी पाणी अशा हिंदी गीतांवर झुम्बाच्या टेप्स सादर करून उपस्थितांना व्यायामाच्या धडे दिले.