आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाल तपमान ३४ अंशांवर, पहाटेच्या गारव्याने दिलासा, शहरात उष्णता वाढण्याचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गत आठवड्यात ४० अंश सेल्सिअसवर तपमापकाचा पारा गेल्याने शहरवासीयांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, तीन दिवसांपासून कमाल आणि किमान तपमानात घट झाल्याने या उकाड्यापासून सुटकारा मिळत आहे. तसेच पहाटेही गारवा जाणवत अाहे. शहरात रविवारी कमाल ३४.३ तर किमान १९.६ अंश सेल्सिअस असे तपमान नाेंदले गेले. मात्र, पुढच्या आठवड्यात कमाल तपमान वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
थंड शहर म्हणून राज्यासह देशात ओळख असलेल्या नाशिक शहरातील कमाल तपमान आता ४१ अंश सेल्सिअसच्या वर जाण्यास सुरुवात झाल्याने शहरवासीयांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यंदा उन्हाची तीव्रता आणि दुष्काळाची छाया यामुळे नागरिक दोन्हीकडून हैराण झाले आहेत. तीन दिवसांपासून शहरातील वातावरण काहीसे ढगाळ झाल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली होती. रविवारीही जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, ओझर, निफाड परिसरात वातावरण ढगाळ होते. सोमवार, मंगळवारपासून वातावरण पुन्हा निरभ्र होणार असल्याने उन्हाची तीव्रता अाणखी वाढण्याची शक्यता असल्याने तपमानातदेखील वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.