आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाचा तडाखा, कमाल तपमान ३५.५, पारा ४० अंशांवर जाण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मार्चच्या मध्यासच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने शहरातील कमाल तपमान गेल्या आठवड्यापासून ३५ अंशांच्या दरम्यान आहे. सोमवारी (िद. २१) कमाल ३५.५, तर किमान १६.९ अंशांची नोंद करण्यात आली. तसेच, तपमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज अाहे.
काही िदवसांपूर्वी शहरात गारवा जाणवत हाेता. गेल्या अाठवड्यापासून कमाल आणि किमान तपमानात वाढ झाल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने झळांनी नागरिक हैराण झाले अाहेत. घामामुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने नागरिकांना वारंवार पाण्यासह इतर शीतपेयांचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे चौकाचौकात ज्यूस, लस्सी, आइस्क्रीम आणि रसवंतीच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी िदसू लागली आहे.

असा करावा बचाव...
^उन्हाच्या तीव्रते पासूनबचाव करण्यासाठी नागरिकांनी पूर्ण सुती कपड्यांचा वापर करावा. तसेच, चेहरा आणि उघड्या हातावर दर सहा तासांनी सनस्क्रीन लोशन लावावे. उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावे. - डाॅ. मनीषा जगताप, स्त्रीरोगतज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...