आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरवासीय उष्म्याने त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गतआठ दिवसांपासून शहरातील कमाल तपमान हे ३३ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने शहरवासीयांना उकाड्याचा सामना करावा लागतो आहे. सकाळी १० वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने चटका बसतो. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी हेल्मेट, टोपी, उपरणे आणि पांढ-या रुमालाचा चेह-यावर आणि डोक्यावर वापर करताना नागरिक दिसत आहेत. शनिवारी शहरात कमाल ३३.३, किमान १५ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या उष्म्यामुळे घामाच्या धारा निघत असल्याने शरीरातील पाणी कमी होऊन तहान लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे.