आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार: बरसला बेभान, नाशिककर हैराण- शहरात अापत्कालीन स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- २००८ सालच्या मुसळधार वृष्टीची अन‌् त्यापाठाेपाठ अालेल्या महापुराची अाठवण ताजी करणारा महापूर मंगळवारी नाशिककरांनी ‘याचि देही याचि डाेळा’ अनुभवला. यंदाची पातळी तर २००८ च्या महापुरापेक्षाही अधिक हाेती. गाेदावरीच्या काठावर असलेल्या अानंदवलीपासून दसकपर्यंतच्या सर्व वस्त्यांमध्ये दुपारपासूनच पाणी शिरले. तर शहराची एकेकाळची मुख्य बाजारपेठ असलेल्या भांडीबाजारापासून सराफबाजारातही पाणी घुसल्याने लहान-माेठ्या व्यावसायिकांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. २००८ च्या पुरापेक्षाही अधिक उंचावरील घरे अाणि दुकानांपर्यंत मंगळवारी पाणी पाेहाेचल्याने यंदाचा महापूर हा अधिक भयावह ठरला.
सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी तर नाशिककरांना ढगफुटीसारख्या वृष्टीचा अनुभव दिला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सर्व नाले दुथडी भरून वाहत हाेते. त्यात साेमवार रात्रीपासून लागलेल्या मुसळधार पावसामुळे गाेदावरीसह नासर्डी, वाघाडी या तिच्या उपनद्यांमध्येही चारही बाजूंनी पाणी मिसळत असल्याने दिवसभरात पाण्याचे प्रमाण वाढतच हाेते. धरणाच्या लाभप्रवण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसानंतर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गाेदावरीच्या पातळीत मिनिटा-मिनिटाला वाढ हाेत हाेती. गंगापूर धरणातदेखील ८५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत हाेते, तसतशी शहरातील पाण्याची पातळी मिनिटागणिक वाढत हाेती. महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना सकाळपासूनच सतर्कतेचा इशारा देण्यात येत हाेता. साेमवारी रात्रीपर्यंतच गोदाकाठावरील टपऱ्या हटवण्यात अाल्या हाेत्या.

शहरातील सर्व माेक्याच्या जागांवर अग्निशानक दलाचे जवान, जीवरक्षक अाणि पाेलिस नागरिकांना सातत्याने पुराच्या पाण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयास करताना दिसून येत हाेते.

१०वाजता बुडाला दुताेंड्या
:रात्रीपासून काेसळलेल्या पावसाने दिवसभरात गाेदावरीच्या पाण्याच्या पातळीत माेठ्या प्रमाणात वाढ हाेत गेली. पहाटे च्या सुमारास दुताेड्यांच्या पाेटापाशी असलेले पाणी सकाळी वाजता खांद्यावर पाेहाेचले हाेते. ११ वाजता खांद्यापर्यंत पाेहाेचले अाहे. १० च्या सुमारास दुताेंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. त्यानंतरही पाणी चढण्याचा वेग कायमच हाेता. दुपारी च्या सुमारास गाडगे महाराज पूलदेखील पूर्ण पाण्याखाली गेला. तसेच नाराेशंकराच्या घंटेलादेखील पाणी लागल्याने हा पूर खऱ्या अर्थाने महापूर असल्याचे अधाेरेखित झाले.

भांडीबाजारातूनसराफ बाजारापर्यंत : शहराचीमुख्य बाजारपेठ असलेल्या भांडीबाजारात सकाळी ११ च्या पावसाने मंगळवारी रात्रीपर्यंत उघडीप घेतलीच नाही. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले हाेते. चाैकाचाैकात पाण्याचे तळे साचलेले दिसत हाेते. त्यातून मार्गक्रमण करताना कार्बाेरेटरमध्ये पाणी गेल्याने अनेक वाहने बंद पडत हाेती. शहरातील अशाेक स्तंभ, रविवार कारंजा, जुने नाशिक, इंदिरा नगर, डिजीपी नगर, पाथर्डी, जुने नवीन सिडकाे, सातपूर, महात्मा नगर, काॅलेजराेड, गंगापूर राेड अादी परिसरात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य दिसत हाेते. साचलेले पाणी काढण्यासाठी ड्रेनेजचे ढापे उघडे केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली हाेती. रस्त्यांवर वाढलेले पाणी अाणि त्यात ढापे काढलेले ड्रेनेज यामुळे अपघात घडण्याचीही संभावना हाेती. काही सुजाण नागरिक ड्रेनेज परिसराभाेवती उभे राहून वाहनचालकांना मार्गदर्शन करीत हाेते. केटीएचएम समाेरील पाेलिस पेट्राेल पंपासमाेर गुडघ्यापर्यंत पाणी साचले हाेते. त्यामुळे हा रस्ता दुपारपासून बंद करण्यात अाला हाेता. गंगापूर नाक्यावरील खतीब डेरी परिसरातही माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. सप्तरंग काॅर्नर परिसरात तर जलतरण तलावासारखी परिस्थिती हाेती. प्रसाद सर्कल, जेहान सर्कल, सावरकर नगर, अानंदवली या भागातही माेठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले हाेते. शिंगाडा तलाव परिसराला अक्षरश: तलावाचे रुप अाले हाेते.

काॅलेजराेडप्रथमच पाण्याने तुडूंब : कॅनडाकाॅर्नर पासून भाेसला मिलीटरी काॅलेजपर्यंतचा काॅलेज राेड दुपारी १२ वाजेपासूनच एकतर्फी बंद करण्यात अाला हाेता. चढावरील रस्त्यांवरुन अालेले पाणी अाणि त्यातच चेंबर अाेव्हर फ्लाे झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली हाेती. त्यामुळे परिसरातील दुकाने बंॅका, शाे रुम, सराफी पेढ्या अादींमध्ये पाणी घुसून माेठे नुकसान झाले. काॅलेजराेड परिसरात अशी परिस्थिती प्रथमच बघायला मिळाली. अर्थात ‘संकट हीच संधी’ समजून काही तरुण साचलेल्या पाण्यात उभे राहून सेल्फी काढताना दिसत हाेते.

शहरातीलसर्वच पुल बंद : चांदशीयेथील पुलापासून रामसेतू पुलापर्यंत सर्वत्र नदीचे पाणी अाले हाेते. चांदशी पुलावर नदीचे पाणी दुपारी वाजेच्या सुमारास अाल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात अाला. या परिसरात स्मशानभूमीही पाण्यात बुडाली हाेती. तर नदीकाठची पत्र्याची घरे पुराच्या पाण्यात वाहून गेेले. अासाराम बापू पुल दुपारी १.३० वाजेच्या सुमारास पाण्यात बुडाला. त्यामुळे वाहतुक पूर्णत: बंद करण्यात अाली. अासाराम बापू अाश्रमातही पुराचे पाणी शिरले. फाॅरेस्ट नर्सरी जवळील पुलावरही नदीचे पाणी अाले हाेते. चाेपडा लाॅन्स येथील पुलापर्यंत पुराचे पाणी अाले नसले तरी पुलाकडे उतार असल्याने अाजूबाजूच्या रस्त्यावरील पाणी पुलावर साचले हाेते. त्यामुळे हा पुल देखील दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात अाला. घारापुरे घाट, गाडगे महाराज, रामसेतु हे पुल देखील पाण्यामध्ये बुडाले हाेते. उंटवाडी पुलावरुन गुडघ्याच्या वरुन पाणी वाहत हाेते. त्यामुळे वाहतुक मुंबई नाका मार्गे वळविण्यात अाली. अशीच परिस्थिती सातपुर येथील अायटीअाय पुलाची हाेती.

चांदशीपुलावर मद्यपीने उलटवली रिक्षा : दुपारीवाजेच्या सुमारास चांदशी पुलाच्या परिसरात एका मद्यपी रिक्षाचालकाने सुसाट वेगाने रिक्षा चालविली. एेन पुलावरच त्याची शुध्द हरपल्याने रिक्षा पलटली. या अपघातात पुर बघायला अालेली एक महिला किरकाेळ स्वरुपात जखमी झाली. यावेळी पाेलिसांनी रिक्षाचालकाला जाेरदार ‘प्रसाद’ही दिला. तर अाजूबाजूच्या नागरिकांनी शिव्यांची यथेच्य लाखाेली वाहिली.

रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या गणपती मंदिरासमाेर माेठा खड्डा पडला अाहे. या खड्ड्यात माेठ्या प्रमाणात पाणी साचून सायंकाळच्या सुमारास परिसरातील दुकानांमध्ये तसेच देना बंॅकेत पाणी शिरले. त्यामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील रानडे वाड्याच्या भिंतीवरही पाणी अाल्याने ही भिंत खचण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. महापालिकेच्या अापत्ती व्यवस्थापन कक्षाने या भागाकडे लक्ष द्यावे अशी मागणी हाेत अाहे.
अापत्कालीन स्थिती
- पाणी साचल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद
-गाेदाकाठ परिसरातील ६०२ कुटुंबांचे स्थलांतर
-नासर्डीनदीने अाेलांडली धाेक्याची पातळी
-अाैद्याेगिकवसाहतींतील कंपन्यांमध्ये शिरले पाणी
-पाेलिसांच्या सुट्या रद्द
-भगूर,देवळाली परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला

शहरात दाेन दिवसांपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिटी सेंटर माॅल परिसराला पाण्याचा असा वेढा पडला हाेता. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात अाला हाेता. यामुळे वाहनचालकांचे हाल झाले. त्यांना महामार्गावरून इतरत्र जावे लागले.
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सुयाेजीत संकुलमध्ये पाणी शिरले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना तातडीने स्थलांतरीत करण्यात अाले. ज्यांचे नातेवाईक येथे नाही त्यांना परिसरातील रहिवाशांच्या नातेवाईकांकडे पाठविण्यात अाले.- अमीतबाेरा, उद्याेजक

सर्व सामान वरच्या मजल्यावर हलविले
खालच्यामजल्यावरील घरातील सर्व सामान वरच्या मजल्यावर नेऊन ठेवले अाहे. नदीचे पाणी घरात शिरण्याची दाट शक्यता वाटत अाहे. -साेनल दगडे, गृहीणी

देवाकडे धावा केला
पुराचे पाणीघरात येते की काय याची भीती वाटत अाहे. पाणी घरात अाल्यास खुप नुकसान हाेते. शिवाय काही दिवस दैनंदिनी पुर्णत: विस्कळीत हाेऊन जाते. त्यामुळे घरात पाणी येऊ नये म्हणून देवाकडे धावा करीत अाहे. -पाैर्णिमा ढाेले, गृहीणी
२००८ मधील पुराची अाठवण
^२००८मध्येझालेल्या पुराचे पाणी अामच्या घरामध्ये अाले हाेते. ही परिस्थिती अाजही उदभवते की काय अशी भीती वाटत हाेती. -राजेंद्र छाजेड, अध्यक्ष, सुयाेजित राे हाऊसेस
पूरग्रस्तांसाठी हेल्पलाइन
मुसळधार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसून झालेले नुकसान बचतकार्यासाठी महापालिकेचा अापत्कालीन कक्ष अग्निशमन दल चाेवीस तास कार्यरत असून, येथे मदतीसाठी संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.
अापत्कालीन कक्षात -२५७१८७२,२३१७६०५, २३१७६०६ तसेच९४२३९८१३८८,तरअग्निशमनच्या १०१,२५९०८७१, २५०८०६० तर२५९२१०२येथेसंपर्क साधावा, असे अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नाशिक मधील पावसाचा कहर... आणि पाहा, Photo...
बातम्या आणखी आहेत...