आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाने शहराला झोडपले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहराला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. नाशिक शहरासह पंचवटी, गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर, सातपूर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, वडनेर दुमाला, पाथर्डी फाटा या भागात जोरदार पाऊस झाला. मेघगर्जना होत असताना आकाशात काळे ढग जमून आल्याने दुपारीच सायंकाळ झाल्याचे चित्र होते.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस हा काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागातून माघारी परतला आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्येस ओडीसा व पश्चिम बंगालच्या भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होत असून, आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या मुख्य हंगामातील अजून थोडेच दिवस शिल्लक आहे.

दिवसभर पुन: पुन्हा जोरदार सरी कोसळल्याने रस्त्यांवर, चौकाचौकात तळे साचले. दारणा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत पाण्यात बुडलेल्या तरुणाच्या शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाने गळ टाकून बोटीद्वारे शोधकार्यात गुरवारपर्यंत यश आले नाही. वालदेवी नदीपात्रातील पाणीपातळीतही वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरल्याने दुचाकी घसरण्याच्या अनेक घटना घडल्या.