आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये पावसाचा तडाखा, वृक्ष उन्मळून पडले, वाहनांचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पावसाचा मुख्य हंगाम संपल्यानंतर रविवारी (दि. ५) दुपारी वाजेच्या सुमारास शहर परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. पंधरा मिनिटांत मिलिमीटर पावसाची नोंद हवामान केंद्रात झाली, तर शहरात वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे काही चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

दुपारी वाजेच्या सुमारास शहरातील पंचवटी, नांदूर नाका, चांडक सर्कल, सीबीएस, जुने नाशिक, मुंबई नाका येथे मुसळधार पाऊस पडला. तर, नाशिकरोड, सिडको, कॉलेजरोड, गंगापूररोड या भागात पावसाचे वातावरण झाले होते, मात्र बरसला नाही. पावसामुळे औरंगाबादरोडवरील विजयलक्ष्मी लॉन्स, जय भवानी रोडवरील विराज स्वीटजवळ, वृंदावन कॉलनी येथे रासबिहारी स्कूलजवळ आणि टाकळीरोडवर आणि द्वारका परिसरात वृक्ष उन्मळून पडले.
वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ठिकठिकाणी वीजतारा एकमेकांना घासल्या गेल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस येण्यापूर्वीच गडकरी चौक, चांडक सर्कल, तिडके कॉलनी, जिल्हा रुग्णालय परिसर, त्र्यंबक नाका, जुने नाशिक, मुंबई नाका परिसर, मायको सर्कल परिसर, उंटवाडी, कॉलेजरोड, महात्मानगर परिसर या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच, आक्टोबर हिटचा उकाडा दिवसभर जाणवत असतानाच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती.