आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुवाधार पावसाने शहरवासीय सुखावले, शहर परिसरात ३४ तासांत १०२ मिलिमीटर पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला असून, शहरात रविवारी रात्रीपासून ते सोमवारी रात्रीपर्यंत ५८.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरवासीयांनी या धुवाधार पावसाचा आनंद घेतला. दोन दिवसांपासून शहरात पाऊस पडत असल्याने नासर्डी, गोदावरी आणि दारणा या नद्या खळाळून वाहत अाहेत. दरम्यान, शहरात आठवडाभर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी भुयारी गटारी अाहेत, मात्र रस्ते दुरुस्तीमुळे चेंबरमध्ये पाणी जात नसल्याने पाणी रस्त्यावरच साचून राहत आहे. रविवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने नागरिकांची सुटी ही घरातच गेली. तर, सोमवारी पहाटेपासून पाऊस सुरू असल्याने चाकरमान्यांची थोडी गैरसोय झाली होती. सोमवारपासून महाविद्यालये सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. सोमवारी सिडको, सातपूर, कॉलेजरोड, जुने नाशिक, पंचवटी, इंदिरानगर, नाशिकरोड, उपनगर, डीजीपीनगर, जेलरोड या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते.

असा बरसला पाऊस (मिलिमीटर)
जुलै(रविवार) सकाळी ८.३० ते ५.३० पर्यंत ४३.४ मिलिमीटर
जुलै (रविवारी) सायंकाळी ५.३० ते जुलै (सोमवारी) सकाळी ८.३० पर्यंत ४०.६ मिलिमीटर
जुलै (सोमवारी) सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत १८.३ मिलिमीटर
गंगापूरराेडवर धाेकेदायक दाेन वृक्ष काेसळले
स्कूल बसवर पडला वृक्ष, मात्र िवद्यार्थी सुरक्षित
गंगापूरराेड येथील धाेकेदायक ठरणारी झाडे अाता नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असून, रविवारी (दि. ३) भाेंसला महाविद्यालयाजवळील माेठे झाड रस्त्यावरून जाणाऱ्या एका शाळेच्या बसवर काेसळले. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसले तरी चालक मात्र जखमी झाला अाहे. दुसरी घटना साेमवारी अानंदवली परिसरात घडली. यातील गंभीर बाब म्हणजे धाेकेदायक झाडे पुनर्रोपित करण्यासाठी झाडांभाेवती खड्डे खाेदण्यात अाले, परंतु महिन्यानंतरही ती पुनर्राेपित करण्यात अाल्याने अाता हेच खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत अाहेत.

यापुढील काळात अशाप्रकारचे धाेकेदायक ठरणारे उर्वरित ४१ वृक्षही पडण्याची भीती व्यक्त हाेत असून, महापालिकेने या वृक्षांचे तातडीने पुनर्राेपण केल्यास हा धाेका टळू शकताे, असे बाेलले जात अाहे.

दाेन दिवसांत उन्मळले ३८ वृक्ष
दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात शहरातील तब्बल ३८ छाेटी-माेठी झाडे काेलमडून पडल्याचे वृत्त अाहे. काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित हाेत हाेता. दहीपूल, मंुबई नाका, म्हसरूळ या ठिकाणी माेठे वृक्ष उन्मळून पडले. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही कोसळलेली झाडे हटविण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
बातम्या आणखी आहेत...