आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढगाळ वातावरणासह शहरात अवकाळी पाऊस; किमान आणि कमाल तपमानात वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान आणि कमाल तपमानात वाढ झाली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने किमान तपमान हे १७.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. एकाच दिवसात पाच अंश सेल्सिअसने तपमानात वाढ झाली. सकाळी सातच्या सुमारास पाऊसही काेसळला. 


बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागाच्या परिसरातील गोलाकार वारे हे श्रीलंका आणि भारताच्या किनारपट्टीला लागून आहेत. अंदमानमध्ये नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव मंगळवारपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत राज्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार असल्याने ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

 
अाता पावसाची शक्यता नाही 
नाशिक जिल्ह्यात या आठवड्यात पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहणार आहे. कमाल आणि किमान तपमानात वाढ होणार असून वाऱ्याचा वेग हा प्रतितास किलोमीटरचा राहणार असल्याचे इगतपुरी भात संशोधन केंद्राचे प्रा. विजय पाटील आणि देवेंद्र फुलपगार यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...