आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरात मध्यरात्रीनंतर मुसळधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सलग बरसत असलेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी दडी मारल्याचे दिसत असतानाच, मध्यरात्रीनंतर नाशिक शहरामध्ये त्याने मुसळधार कोसळायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रपाळी संपवून घरी परतणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
जिल्ह्याच्या काही भागांतही मध्यरात्रीनंतर पाऊस पडल्याचे वृत्त होते. गेल्या वर्षी अवकाळी पावसाशी लढा दिल्यानंतर शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या तावडीत सापडला होता. परंतु, संघर्ष करत पिकांना जीवदान देत असताना गेल्या आठवड्यापासून पावसाच्या माऱ्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.