आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकला अवकाळी पावसाने झाेडपले,सलग तिसर्‍या दिवशी फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लक्षद्वीपते गुजरातपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने रविवारी पुन्हा नाशिक शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरश: झाेडपून काढले. दुपारी चार वाजेपर्यंत पावसाचे कोणतेही चिन्हे नसताना अवघ्या पंधरा मिनिटांत ढग जमून अाल्यानंतर शहरात सुमारे तीन- साडेतीन तास दमदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला, तर जिल्ह्यातील फळबागा भातपिकांचे माेठे नुकसान झाले.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बेमाेसमी पाऊस पडत आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले, त्यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडत होती. तसेच जुने नाशिक, मुंबई नाका, चांडक सर्कल, सीबीएस, महात्मानगर, सिडको, राणेनगर आणि इंदिरानगर आदी भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती.

त्र्यंबकला चिखल, भाविकांचे हाल
त्र्यंबकेश्वरशहर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतात काढून ठेवलेल्या भात पिकाचे माेठे नुकसान झाले. उभ्या भात पिकांसही पावसाचा माेठा फटका बसला. शेतकऱ्यांचे नुकसान हाेऊनही संबंधित खात्याचे अधिकारी अजूनही पंचनामे करण्यासाठी उदासीन असल्याचे दिसते. कुंभमेळ्यासाठी शहरातील प्रत्येक रस्ता खाेदून लाेखंडी पाइप टाकण्याचे काम सुरू अाहे. पाऊस पडल्याने त्या ठिकाणी अक्षरश: चिखल झाला, त्यामुळे पायी चालणेही कठीण बनले हाेते. त्यामुळे शहरात अालेल्या भाविकांचीही माेठी गैरसाेय झाली.
जाेरदार बेमाेसमी पावसामुळे रविवारी सायंकाळी नाशिकमधील प्रमुख रस्ते जलमय झाले हाेते. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच त्रेधा उडाली.