आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुसाट अवजड वाहनांवर कारवाईची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- द्वारका परिसरातील काशी माळी मंगल कार्यालय परिसरातून सर्रासपणे अवजड वाहनाची वाहतुक सुरू आहे. नागरी वस्तीचा भाग असल्याने या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करून अवजड वाहनाची वाहतूक रोखावी, अशी मागणी संत गाडगे महाराज मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या किनारी घाट तयार करण्याचे काम सुरू आहे. या घाटाच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक अवजड वाहनाद्वारे केली जाते. वाहनचालक साहित्य वाहून नेण्यासाठी काशी माळी मंगल कार्यालयाच्या जवळील मार्गाचा वापर करतात. या मार्गावरून अतिशय वेगाने ही अवजड वाहने जातात. नागरी वस्तीचा भाग असल्याने या ठिकाणी लहान मुले, पादचारी वाहनधारकांची ये जा सुरू असते परिणामी वेगाने येणाऱ्या अवजड वाहनामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाईची भीती न बाळगात सर्रास अवजड वाहने नेली जात आहे. या बाबीकडे वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी, मागणी संत गाडगे महाराज मित्र मंडळाचे पदाधिकारी जितेंद्र बच्छाव सचिन कर्डिले, भुषण विसपुते, सागर औटी, निखिल महाजन, सागर राजपूत आदींनी केली आहे.
तातडीने कारवाई करावी
या मार्गावरून अत्यंत वेगाने अवजड वाहने धावत असतात. वारंवार सांगूनही ते वेग कमी करत नाहीत. वाहतूक पोलिसांनी नागरी वस्तीतून जाणाऱ्या अशा अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
मंगेश आहिरे, नागरिक.