आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Helmet Holder Women Give Secure Transport Massage

हेल्मेटधारी महिलांच्या रॅलीने सुरक्षित वाहतुकीचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत सनविवि फाउंडेशन अारटीअाे यांच्या वतीने काॅलेजराेडवर रविवारी महिलांची हेल्मेट रॅली काढण्यात अाली. या रॅलीद्वारे महिला दुचाकीचालकांचे वाहतूक नियम रस्ता सुरक्षा याबाबत प्रबाेधन करण्यात अाले.
नाशिक - एरवीसुसाट दुचाकी चालविणाऱ्या स्कार्फधारी तरुणींची वर्दळ असलेला काॅलेजराेड रविवारी मात्र हेल्मेटधारी महिलांनी लक्षवेधी ठरला. सुरक्षिततेसाठी अावश्यक हेल्मेट अन् वाहनांचा नियंत्रित वेग यांचे महत्त्व सांगण्यासाठी सनविवि फाउंडेशन अाणि शहर वाहतूक पाेलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट रॅली काढण्यात अाली. यात ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड क्वीन- २०१५’ नमिता काेहक यांनी हेल्मेटची गरज िकती असते, याविषयी माहिती दिली.
दुचाकीचालकांसाठी हेल्मेट, चारचाकीचालकांसाठी सीटबेल्ट शासनाने बंधनकारक केले अाहे. परंतु, महिलांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण माेठे असल्याने हेल्मेटचे महत्त्व समजावे, यासाठी ही रॅली काढण्यात अाली. पाेलिस उपायुक्त विजय पाटील, सहायक अायुक्त प्रशांत वागुंडे, वरिष्ठ निरीक्षक एम. ए. बागवान, नम्रता देसाई, ‘सनविवि’चे अध्यक्ष धीरज बच्छाव अादींच्या उपस्थितीत भाेंसला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून रॅली निघाली. महात्मानगर, काॅलेजराेड अशी निघून महात्मानगर क्रिकेट मैदानावर रॅलीचा समारोप झाला. सनविविच्या सोनल नेरे, सोनल मांडगे, अादिती आंबेकर, काजल विसपुते, ईशा पाटील, अमी छेडा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी, चालक वाहतूक पोलिस उपस्थित होते.

संस्कृती अन् संस्काराचा संगम
नऊवारी साडी, नाकात नथ अाणि डाेक्यावर हेल्मेट परिधान केलेल्या प्रमिला पाटील या रॅलीमध्ये लक्षवेधी ठरल्या. महाराष्ट्राची संस्कृती अाणि सुरक्षिततेचा संस्कार यांचा संगम त्यांनी अापल्या पेहरावातून दर्शविल्याने त्यांचे सर्वांनीच काैतुक केले.

हेल्मेटच्या वापराबाबतचे गैरसमज दूर व्हावेत
हेल्मेटच्या वापराबाबत सर्वाधिक उदासीनता महिला विशेषत: तरुणींमध्ये दिसते. हेल्मेटविषयी अनेक गैरसमज असल्याने ते वापरण्यास टाळाटाळ केली जाते. हे गैरसमज दूर करण्यासाठी अशा प्रकारची रॅली काढणे गरजेचे अाहे. नम्रता देसाई, वरिष्ठ पाेलिस उपनिरीक्षक

हेल्मेट वापराचा दिला संस्कार
अनेक संस्कार महिलांकडून घेऊन आपण मोठे हाेताे. नाशिकमधील महिलांनी आज वाहनचालकांना खऱ्या अर्थाने हेल्मेट वापरासंदर्भात एक संस्कारच दिला आहे. - धीरज बच्छाव, अध्यक्ष,सनविवि फाउंडेशन

हेल्मेटने केस गळतात हा गैरसमज
हेल्मेट घातल्याने केस गळतात, हा गैरसमज अाहे. हेल्मेटचा दर्जा चांगला असेल तर त्यातील हवेसाठी ठेवण्यात अालेले भाग चांगले असतील तर काेणताही प्रश्न उद्भवत नाही. श्रुती भुतडा, सॅव्हीअकॅडमी

सुरक्षिततेसाठी हेल्मेट प्रत्येकाने वापरावे
वाढती वाहन संख्या त्यामुळे नेहमी हाेणारे अपघात लक्षात घेत प्रत्येक दुचाकीचालकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वेच्छेने हेल्मेट वापरावे. नमिता काेहक, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड क्वीन-२०१५

महिलांसाठी हेल्मेटचे फायदे!
>चेहरा, डोके सुरक्षित राहते
>चेहऱ्याचे धुळीपासून संरक्षण हाेते
>डोळ्यात कचरा, नाका-तोंडात धूळ जात नाही
>अपघात झाला तरीही जोरात मार लागत नाही
>डोक्याला गंभीर इजा होत नाही
>सुरक्षित प्रवास होण्यास मदत
>केसांची निगा राखली जाते
>थंडीत हेल्मेटने ऊब मिळते