आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातातील जखमींना तातडीने करा मदत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दुचाकी अपघातात जखमी मुलगा अर्धा तास मदतीसाठी विव्हळत पडला होता. मदत केल्याने एकुलता एक मुलगा कायमचा निघून गेला, अशी खंत या मुलाच्या मातेने व्यक्त करत अशी वेळ इतरांवर येऊ नये यासाठी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करावी, असे आवाहन ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून केले आहे.
दिंडोरीरोडवरील अपघातात तीन तरुण ठार झाल्याची बातमी वाचल्यानंतर एका अपघातात पुत्र गमावलेल्या मीनाक्षी सोनार या मातेने ‘दिव्य मराठी’कडे भावना प्रकट केल्या. मुलगा अर्जुन सराफ दसक-पंचक पुलावर दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झाला हाेता. वेळीच उपचार मिळाले असते तर तो वाचला असता. मात्र, नागरिकांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतली. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वाहनांवर झेंडे लावून फिरणारे, नियम मोडणाऱ्यांवर, झेंडे लावण्यावर बंदी घालावी, असे सांगत त्यांनी अपघात झाल्यानंतर नागरिकांनी वेळीच मदत केल्याने त्या निष्पाप लोकांचा जीव जातो. प्रत्येकाने अशी मदत केल्यास अशा अनेक मातांच्या म्हातारपणाची काठी शाबूत राहील. ज्यांचा एकुलता एक मुलगा जातो त्यांचे सर्वस्व गमावले जाते. माझा अर्जुन गेला. जगणे आता अर्थहीन झाले आहे. अशी वेळ शत्रूवरही येऊ नये इतकीच इच्छा, असे त्या म्हणाल्या.