आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Help Of Lay Detector In The Indtrakund Murder Case In Nashik

इंद्रकुंड खूनप्रकरणी ‘लाय डिटेक्टर’, या प्रकरणी पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इंद्रकुंड येथील सिंधू चव्हाण खून प्रकरणातीत मुख्य संशयिताची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात येणार असून, याबाबत पंचवटी पोलिसांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त एन. अंबिका यांनी दिली. एक महिन्यापूर्वी इंद्रकुंड येथील पत्र्याच्या शेडमध्ये या वृद्धेचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे.

इंद्रकुंड येथील एका आश्रमालगतची जागा घेण्यासाठी प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक वृद्धेवर दबाव आणत असल्याची चर्चा होती. यास पोलिसांनी दुजोरा दिला होता. खुनानंतर वीस दिवसांनी पोलिसांनी मोबाइल चोरीच्या संशयातून पकडलेल्या पवन लक्ष्मण सावकार (रा. एरंडवाडी), सूरज वर्मा, राहुल कुडीलकर, अक्षय अहिरे आणि सुरक्षारक्षक तुळशीराम इंगोले यांना अटक केली. वृद्धेचा मोबाइल आणि गॅस सिलिंडर चोरण्याच्या उद्देशाने सावकार आणि वर्मा यांनी खून केल्याचे चोरी गेलेल्या मोबाइलच्या अाधारे उघडकीस आले. मात्र मोबाइल आणि सिलिंडर चोरीच्या उद्देशाने गळा आवळून खून झाल्याचा प्रकार पोलिसांना पचनी पडल्याने मुख्य संशयित सावकारच्या लाय डिटेक्टर चाचणीचा निर्णय झाला. याबाबत संबंधित विभागाकडे परवानगी घेण्यात आली आहे. दरम्यान, पंचवटी परिसरातील तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या वरिष्ठ निरीक्षक प्रकाश सपकाळे, सहायक निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा आयुक्तांनी सत्कार केला.