आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदिवासी पाड्यांवरील मुलांना मदतीचा हात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, आदिवासी पाड्यांवरील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात मदत व्हावी आणि त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, या उद्देशातून विद्यार्थी प्रतिष्ठानतर्फे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध आश्रमशाळा, आदिवासी पाडे, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या या साहित्यांचा लाभ सुमारे ५०० विद्यार्थ्यांना होणार आहे. या मोहिमेची माहिती समजताच अनेक नगरसेवकांनी उद्योजकांनी, सामाजिक, धार्मिक संस्थांनी, स्वयंसेवी संस्था आदींनी स्वयंस्फूर्तीने मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. आपणही या मोहिमेत सहभागी होऊन या होतकरू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग सुकर करावा वस्तू देऊन विद्यार्थी प्रतिष्ठानचे हात बळकट करावेत.
जिल्ह्यातील इतरही दानशूर व्यक्तींनी प्रतिष्ठानच्या ८१४९५२०९४५ या क्रमांकावर संपर्क साधून आदिवासी पाड्यांवरील या गरीब-गरजू मुलांना मदत करावी, असे आवाहन विद्यार्थी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन पवार, विवेक चौधरी, राहुल ढगे, स्नेहल ढाकणे, गणेश सानप, संतोष जयस्वाल, महेंद्रसिंग मगर, प्रीतेश पूरकर, सुमीत पाळदे आदी स्वयंसेवक सक्रिय आहेत.
विविध साहित्याचे होणार वाटप
विद्यार्थी प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत गणवेश, नोंदवही, पुस्तके, अंकलिपी, पेन, चित्रकला वही, रंगपेटी, पट्टी, पेन्सिल, रबर, शार्पनर, खेळणी, वॉटर बॅग असे विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या िशक्षणात अडथळा येणार नाही आणि त्यांचा शैक्षणिक विकास होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...