आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारका परिसरात बॉम्बशोधक यंत्राद्वारे वाहनांची तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहस्थामुळे पंचवटी पाेलिस बाॅम्बशाेधक पथकाद्वारे दरराेज वाहनांची तपासणी होणार असून, शुक्रवारी द्वारका भागात बॉम्बशोधक पथकाकडून यंत्राद्वारे सुरू असलेली वाहन तपासणी. - Divya Marathi
सिंहस्थामुळे पंचवटी पाेलिस बाॅम्बशाेधक पथकाद्वारे दरराेज वाहनांची तपासणी होणार असून, शुक्रवारी द्वारका भागात बॉम्बशोधक पथकाकडून यंत्राद्वारे सुरू असलेली वाहन तपासणी.
नाशिक - सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावधान झाली असून, शहरातील मुख्य चौकांत वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात अाली अाहे. शुक्रवारी भद्रकाली पोलिस बॉम्बशोध पथकाकडून संपूर्ण द्वारका परिसराची श्वान पथकाने बॉम्बशोधक पथकाने यंत्राद्वारे तपासणी केली.

सीमेवर पाकिस्तानकडून सुरू असलेले हल्ले याकूब मेमनच्या फाशीनंतर नाशिकमध्ये हाय अलर्ट घाेषित करण्यात अाला अाहे. तर, सिंहस्थाची पहिली पर्वणी २९ ऑगस्ट राेजी असल्याने पोलिस यंत्रणेकडून सुरक्षा व्यवस्थेसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शुक्रवारी शहराचे मुख्य द्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका परिसरात बाहेरगावहून येणाऱ्या लक्झरी बस, ट्रॅव्हल्सच्या गाड्यांसह रिक्षा इतर वाहनांची तपासणी श्वान पथक बॉम्बशोध यंत्रणेद्वारे करण्यात आली अाहे.

ही मोहीम आता सिंहस्थाच्या सर्व पर्वण्या होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक एस. डी. चव्हाण, वाहतूक शाखेचे शंकर कांबळे, बॉम्बशोध पथकाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.